Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात श्रद्धांजली

बीड । प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या नि

जनतेच्या पैशातून होणारी विकासकामे, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा-उपमुख्यमंत्री अजित पवार
कर्तव्यात हयगय न करता रिझल्ट ओरियंटेड काम करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
शिंदे-फडणवीस सरकारने कामांना स्थगिती देऊन काय मिळवले

बीड । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कार्याचा, नेतृत्वाचा आणि जनसेवेचा गौरव करण्यात आला.

COMMENTS