Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परिवहन मंत्री सरनाईकांनी केला एसटीने प्रवास

मुंबई : आधुनिक युगामध्ये ’स्वच्छता’ हा कोणत्याही व्यवसायाचा मूलभूत पाया असतो. त्यामुळे प्रवासी सेवेमध्ये प्रवाशांना स्वच्छ, सुंदर बसस्थानक, बस स्

निवडणुकीचे गाजर आणि घोषणांचा पाऊस
H३N२ आणि कोविड १९ हे दोन वेगवेगळे विषाणू आहेत – आरोग्य मंत्री तानाजी सावंत 
दीड लाखाची लाच घेतांना तहसीलदारास रंगेहाथ पकडले
May be an image of 10 people

मुंबई : आधुनिक युगामध्ये ’स्वच्छता’ हा कोणत्याही व्यवसायाचा मूलभूत पाया असतो. त्यामुळे प्रवासी सेवेमध्ये प्रवाशांना स्वच्छ, सुंदर बसस्थानक, बस स्थानकाचा परिसर आणि तेथील प्रसाधनगृहे पुरवणे याला भविष्यात आमच्याकडून प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरूवारी दिली. पनवेल ते खोपोली एसटी बसमधून प्रवास केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी बोलतांना मंत्री सरनाईक म्हणाले की, हिंदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवून राज्यभरातील सर्व बसस्थानकांचा कायापालट करणे, हा आमचा उद्देश आहे. याबरोबरच प्रत्येक आगारात चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचार्‍यांसाठी असलेली विश्रांतीगृह देखील स्वच्छ आणि निटनेटकी असावेत, यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. या भेटीमध्ये मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकावरील प्रसाधनगृहाला भेट देऊन तेथील प्रशासनाला अस्वच्छतेबाबत खडे बोल सुनावले तसेच बसस्थानकावरील आरक्षण खिडकी, पिण्याच्या पाण्याचे सोय याची पहाणी केली. फलाटावर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला, त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या तसेच त्यांच्या तक्रारीचे तातडी निवारण करण्याचे निर्देश उपस्थित एसटी अधिकार्‍यांना दिले.

COMMENTS