Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगवड पुलाजवळ भीषण अपघात; 3 ठार, 2 गंभीर

पाटण / प्रतिनिधी : नवारस्ता-ढेबेवाडी मार्गावर रविवारी रात्री सांगवड पुलाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन

Buldhana : आपण एकजूट दाखवली नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही – डाॅ.राजु वाघमारे
माण तालुक्यात अवैध वाळू उपसा; 17 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त
फलटण येथे जुगाराच्या अड्ड्यावर छापा; 12 जणांविरोधात गुन्हा दाखल

पाटण / प्रतिनिधी : नवारस्ता-ढेबेवाडी मार्गावर रविवारी रात्री सांगवड पुलाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीनजण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
नितीन बबन तिकुडवे (वय 36) रा. शिंदेवाडी, भरत रामचंद्र पाटील (वय 43), बबन धोंडीराम पडवळ (वय 70, दोघे रा. येरफळे), अशी मृतांची नावे आहेत, तर अनिकेत ज्ञानदेव पाटील (रा. शिंदेवाडी), संकेत सिताराम शिंदे (रा. तामकणे) हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांचेवर सह्याद्री हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलिसांत झाली आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे शिंदेवाडी व येरफळे गावांवर शोककळा पसरली आहे.

COMMENTS