पुणे/प्रतिनिधी ः पुणे ते मुंबई महामार्गावर बोरघाट पोलिस चौकीजवळ एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दोन ट्रकचा भीषण
पुणे/प्रतिनिधी ः पुणे ते मुंबई महामार्गावर बोरघाट पोलिस चौकीजवळ एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दोन ट्रकचा भीषण अपघात घडल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात एका ट्रकचालकाचा मृत्यु झाला असून महामार्गावरील एका लेनवरील वाहतूक तीन तास बंद ठेवल्याने वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहवयास मिळाले आहे.
सदानंद पाटील (वय-43) असे या अपघातात मयत झालेला ट्रकचालकाचे नाव आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेपाच वाजण्याचे सुमारास पुणे बाजूकडून मुंबईच्या दिशेने ग्लास घेऊन ट्रकचालक सदानंद पाटील ट्रक एमएच 09-सीयु-6168 घेऊन जात होते. त्यावेळी बोरघाट परिसरात त्यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या पुढे दुसर्या लेन मधून जात असलेल्या ट्रक क्रमांक केए-32-डी-3293 या ट्रकला पाठीमागून जोरात ठोकर देऊन पहिल्या लेनवर पलटी झाला. त्यामुळे या भीषण अपघातात ट्रकचालक पाठील व दोन सहप्रवासी हे केबिन मध्ये अडकून पडले. अपघाताची माहिती मिळताच, सदर ठिकाणी आरआरबी कडील देवदूत पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने ट्रकच्या केबीनमध्ये अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सदर व्यक्तींना गंभीर दुखापत झाली असल्याने आयआरबीच्या रुग्णवाहिकेतून त्यांना खापोली परिसरातील ट्रॉमा केअर रुग्णालयात औषध उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र, ट्रकचालक पाटील याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, या अपघातात पाटील यांचा ट्रक रस्त्यावर पलटी झाल्याने त्यातील ग्लास या रस्त्यावर पडल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला. त्यामुळे आयआरबीचे जेसीबी, डंपरच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेला माल बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली. मुंबईच्या दिशेने जाणार्या तीन लेन चालू झाल्या असून सकाळी साडेपाच ते साडेआठ यादरम्यान लेन बंद झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरु होती.
COMMENTS