Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तारुण्यात ज्ञानसमृद्ध, परोपकारी व नीतिमान व्हावे ः किशोर काळोखे

सातारा : आयुष्याची वाट ही पळवाट अथवा चोरवाट नसावी तर आपणच आपली पाऊलवाट तयार करावी. विवेकाच्या वाटेवर आपण आपली बुद्धिमत्ता, परोपकार वृत्ती आणि संक

सोयीचे राजकारण
बँक कर्मचार्‍यांचा संप स्थगित
शिवमंदिरावर दरड कोसळून 14 जणांचा मृत्यू

सातारा : आयुष्याची वाट ही पळवाट अथवा चोरवाट नसावी तर आपणच आपली पाऊलवाट तयार करावी. विवेकाच्या वाटेवर आपण आपली बुद्धिमत्ता, परोपकार वृत्ती आणि संकटांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करू शकतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर इतरांचे अनुकरण न करता, स्वताची शैली विकसित केली पाहिजे, ज्ञानाने समृध्द आणि जबाबदारीचे भान असायला हवे. उज्ज्वल भविष्यासाठी आपण अधिक प्रगल्भ ,उन्नत होण्यासाठी पुस्तक वाचून, लेखन करायला शिकले पाहिजे, तंत्र युगात आपण वापर आणि गैरवापर यामधील फरक ओळखायला हवंय. सगळ्यात महत्त्वाचे आपण अनुकरण न करता, व्यक्तिमत्वाचे पैलू ओळखून त्यांना अधिक मूल्यांची जोड द्यायला हवे, व्यसनांना ठामपणे नकार द्यायला शिकले पाहिजे , तारुण्यात ज्ञानसमृद्ध परोपकारी व नीतिमान व्हावे’ असे विचार  प्रेरणा संवर्धन तज्ज्ञ  किशोर काळोखे यांनी व्यक्त केले. ते येथील  कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या विशेष व्याख्यान कार्यक्रमात‘ तारुण्याच्या  उंबरठ्यावर‘ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्ष म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.सुभाष वाघमारे हे उपस्थित  होते. प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांचे मार्गदर्शनाने  कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. बी.ए .भाग 1 व एम.ए .भाग 1 या वर्गातील मराठीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत यावेळी करण्यात आले.
           आपल्या आई वडील यांच्यासाठी आपण काय करतो?  याचा विचार करावा असा प्रश्‍नही त्यांनी उभा केला. प्रारंभी कर्मवीर प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक मराठी विभागातील प्रा. डॉ. विद्या नावडकर यांनी केले. ऋतुजा पाटील, समीक्षा चव्हाण, पलक जाधव, निकिता जाधव, धनश्री निंबाळकर, पूजा बरकडे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोनाली जाधव व समीक्षा चव्हाण यांनी केले. तर आभार मयुरी शिवशरण हिने आभार मानले. या कार्यक्रमास इतिहास विभागातील प्रा.शरद ठोकळे, कुचेकर, प्रा. डॉ. संजयकुमार सरगडे, प्रा. प्रियांका कुंभार, श्रीकांत भोकरे आणि मराठी विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

अस्वस्थेच्या वातावरणात काळोखेंची प्रेरणादायी वाटचाल ः प्रा. डॉ. वाघमारे – अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.सुभाष वाघमारे म्हणाले की’ अतिशय वेगवेगळ्या परिस्थितीत आज भारतातील तरूण जगत आहे. आर्थिक विषमता, धर्मांधता, हिंसा, बेरोजगारी, गरिबी, चंगळवाद, यामुळे भोवताल गोंधळून गेलेला आहे. राजकीय वातावरण अस्वस्थता वाढवणारे आहे. नोकरीच्या आशेने असलेल्याला आज अपेक्षा भंगाचे मोठे दुःख आहे. नैराश्य मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मानसिक ताण वाढत आहे. अशावेळी किशोर काळोखे यांच्या सारखे आशावादी सज्जन लोक तरुणांच्या मनाची काळजी घेऊन धीर देत आहेत. चांगले जीवन जगण्यासाठीचा मार्ग सांगत आहेत. स्वतःचा विश्‍वास वाढवत आहेत. हे संकटकाळी धीराने वाटचाल करायला लावणारे बोल आहेत. स्वतःवर नियंत्रण ठेवून, कर्तव्य करण्यास, व स्वहित ते देशहित करण्यासाठी ते मार्गदर्शन करत आहेत. कॉलेज तरुणांनी किशोर काळोखे यांची गावागावात व्याख्याने ठेवली तर गावे अधिक चांगल्या दिशेने वाटचाल करतील असेही ते म्हणाले.

COMMENTS