मधुमेह (डायबिटीज) नियंत्रणासाठी आणि त्यासंबधी असणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व्यवस्थित आहार आणि व्यायाम, योगासन तसेच काही घरगुती आणि आयुर्वेदिक उप
मधुमेह (डायबिटीज) नियंत्रणासाठी आणि त्यासंबधी असणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व्यवस्थित आहार आणि व्यायाम, योगासन तसेच काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांवरही लक्ष द्यायला हवे. मधुमेह नियंत्रणांत ठेवण्यासाठी काही टिप्स आहेत ज्या तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात वापरल्या तर मधुमेहामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या टिप्स खूप प्रभावी आहेत.या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल.
1) ही फळे व भाज्या अधिक प्रमाणात घ्या दैनंदिन आहारात पालक, मेथी, दुधी, टोमॅटो, कारले आणि शेवग्याच्या शेंगा यासारख्या भाज्या आणि बेरीज, जांभूळ, सफरचंद, आवळा, पपई, डाळिंब, पपई, किवी या फळांचा अधिक समावेश करा.अन्नामध्ये बेसन, नाचणी आणि ज्वारीचे पीठ वापरावे. याशिवाय जेवणानंतर वज्रासनात बसण्याचा प्रयत्न करावा.
2) हे पदार्थ खाऊ नका साखर, दही, डीप फ्राय, आंबवलेले पदार्थ आणि मैद्याचे सेवन कमी करा.
3) दुधीचं सूप प्या मधुमेहाचे रूग्ण रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दुधीचे सूप कोणत्याही दिवशी किंवा आठवड्यातून दोनदा नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणानंतर घेऊ शकतात. याशिवाय आवळा आणि हळद यांचे रोज सेवन केल्यानेही फायदा होतो.
4) सकाळचं कोवळं ऊन सकाळी 9 वाजण्यापूर्वी 20 मिनिटे सूर्यप्रकाशात जा.
5) पायी चाला रोज किमान 45 मिनिटे योगा आणि प्राणायाम करा. चालण्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवणानंतरही थोडस चाला. दररोज किमान 5000 पावले किंवा जास्तीत जास्त 10,000 पावले चालण्याचा प्रयत्न करा.
6) योगासन करा – 1) भुजंगासन 2) बालासन 3) धनुरासन 4) मंडुकासन 5) शशांकासन जमेल तसे योगासने करा.
COMMENTS