Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘टायगर 3’च्या कमाईमध्ये मोठी घसरण

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानचा ‘टायगर 3’ हा सिनेमा नुकताच चाहत्यांचा भेटीला आला आहे. दिवाळीच्या मुहू

राजधानीत पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू
साडेबारा हजार शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्यांचा लाभ
मी परतीचे दोर स्वत कापले- वसंत मोरे

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानचा ‘टायगर 3’ हा सिनेमा नुकताच चाहत्यांचा भेटीला आला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धमाका केला आहे. लवकरच हा सिनेमा जगभरात 300 कोटींचा टप्पा पार करणार, अशी माहिती समोर आली आहे. टायगर 3’ हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 44.5 कोटींचा गल्ला कमावला आहे. दुसऱ्या दिवशी 59.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 44.3 कोटी, चौथ्या दिवशी 21.1 कोटी आणि पाचव्या दिवशी 18.50 कोटींची मोठी कमाई केली आहे. तसेच रिलीजच्या 5 दिवसांत या सिनेमाने 187.65 कोटींचा गल्ला कमावला आहे. तर जगभरात या सिनेमाने आतापर्यंत 270.55 कोटींची मोठी कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 300 कोटींचा टप्पा पार करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. टायगर 3’ या सिनेमाने धमाकेदार ओपनिंग केली आहे. परंतु नंतर या सिनेमाच्या कमाईमध्ये मोठी घसरण होत असल्याचं बघायला मिळालं आहे. आता पुन्हा वीकेंडला या सिनेमाच्या कमाईमध्ये मोठी वाढ होऊ शकणार आहे. किंग खानच्या पठाणने रिलीजच्या पाचव्या दिवशी 60.75 कोटींचा गल्ला कमावला होते. तर जवानने 32.92 कोटींची कमाई केली होती. ‘गदर 2’चं पाचव्या दिवशीचं कलेक्शन 55.40 कोटी रुपये होतं. या सर्वांच्या तुलनेत टायगरचं पाचव्या दिवसाचं कलेक्शन अतिशय कमी आहे.

COMMENTS