Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कसाराजवळ तीन मजुरांना डंपरने उडवले

ठाणे : जिल्ह्यातील समृद्धी एक्स्प्रेस वेच्या बांधकाम साईटवर भरधाव डंपरने तीन मजुरांना उडवले. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण ज

मद्यधुंद चालकाचे ट्रक वरचे नियंत्रण सुटल्याने ट्रकचा आपघात 
चोरट्यांनी पादचार्‍याला गाडीने चिरडलं !
बस आणि आयशरच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू

ठाणे : जिल्ह्यातील समृद्धी एक्स्प्रेस वेच्या बांधकाम साईटवर भरधाव डंपरने तीन मजुरांना उडवले. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यातील कसारा भागातील वाशाळा पुलाजवळ रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.मिळालेल्या महितीनुसार, अशोक जाधव (वय, 50) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत अशोक यांचा 22 वर्षांचा मुलगा आणि 60 वर्षांची महिला जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS