Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापुरात तिघांचा बुडून मृत्यू

कोल्हापूर ः जिल्ह्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुबांतील तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली. आजर

भाळवणी विद्यालयास रयतचा सर्वोच्च ‘कर्मवीर’ पुरस्कार
आपली पेन्शन आपल्या दारी मोहिमेला प्रथम पुरस्कार
जय श्रीरामच्या जयघोषाने नेवासेनगरी दुमदुमली !

कोल्हापूर ः जिल्ह्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुबांतील तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली. आजरा तालुक्यातील गजरगावमध्ये हिरण्यकेशी नदीवरील बंधार्‍यात धुणे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 3 जणांचा बुडून मृत्यू झाला. यासंबंधीच्या वृत्तानुसार, येथील उदय बचाराम कटाळे (54), अरुण बचाराम कटाळे (56) हे बंधू धुणे धुण्यासासाठी हिरण्यकेशी नदीच्या बंधार्‍यावर गेले होते. यावेळी अरुण यांचा मुलगा जयप्रकाश (13) बंधार्यामध्ये धुणे धुत असताना अचानक बुडू लागला. हे पाहून अरुण यांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. त्यानंतर हे दोघेही बुडू लागले. या दोघांना वाचवण्यासाठी उदय व अन्य एकाने उडी मारली. पण दुर्दैवीने अरुण, जयप्रकाश व उदय या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील 3 सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS