Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू

वाशिम : समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून या महामार्गावर सुरू असलेली अपघाताची मालिक अद्यापही संपण्याची चिन्हे नाहीत. सोमवारी या महामार्गावर झालेल

भरधाव असलेल्या कारच्या धडकेत ऑटो चालकाचा मृत्यू
तिरुवन्नामलाईमध्ये अपघातात 7 जणांचा मृत्यू
एक्सप्रेसवर कंटेनरचा झाला ब्रेक फेल

वाशिम : समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून या महामार्गावर सुरू असलेली अपघाताची मालिक अद्यापही संपण्याची चिन्हे नाहीत. सोमवारी या महामार्गावर झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. वाशिमच्या समृद्धी महामार्गावर नागपूर लेनवर हा अपघात झाला आहे. या मार्गावर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या एका ट्रकला मागच्या बाजूने भरधाव कारने धडक दिली. हा अपघातात कारचा पुढाचा भाग ट्रकच्या मागच्या बाजूत घुसला, यात कारचा चक्काचूर झाला होता.
समृद्धी महामार्गावर सोमवारी मालेगांवच्या वाशिम मार्गावरील रिधोरा इंटरचेंजजवळ हा ट्रक उभा होता. यावेळी एक कार भरधाव वेगात आली. रस्त्यावर उभा असलेला ट्रकचा अंदाज अपघातग्रस्त कार चालकाला आला नाही. यामुळे भरधाव वेगात असणारी ही कार थेट ट्रकच्या मागच्या बाजूला धडकली. या कारचा समोरील अर्धा अधिक भाग हा ट्रक खाली घुसला. यात कार मधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना आणि महामार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तीन मृतकांपैकी कार मधील मागील मृतदेह काढून ते मालेगांव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतांची नावे अजूनही समोर आलेली नाही. कारच्या पुढील सीटवर बसलेला चालक आणि व एकाचा मृतदेह कारमध्येच फासला होता. हे मृतदेह जेसीबीच्या साह्याने काढण्यात येणार आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

COMMENTS