Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वांद्रे-कुर्ला संकुलात पॉड टॅक्सी आगार उभारणार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे ते कुर्ला व्हाया वांद्रे-कुर्ला संकुल अशी पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं चाकूने भोसकलं ! I LOKNews24
मोदींना वाढदिवसानिमीत्त पाठविले पाच हजार पोस्ट कार्ड
अहमदनगरचे जिल्हाधिकारी झारीतील शुक्राचार्य…

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे ते कुर्ला व्हाया वांद्रे-कुर्ला संकुल अशी पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पॉड टॅक्सी मार्गिकेच्या बांधणीसह पॉड टॅक्सी सेवेचे संचलन, देखभालीसाठी एमएमआरडीएने नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करत शक्य तितक्या लवकर कामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. दरम्यान या पॉड टॅक्सी प्रकल्पातील डेपो बीकेसीत 5000 चौ मीटर जागेवर बांधण्यात येणार आहे. या डेपोत एका वेळी 208 पॉड टॅक्सी उभ्या करता येणार असून येथे या टॅक्सीची देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे.
बीकेसीतील वाहतूक कोंडी दूर करत बीकेसीत येणे-जाणे सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक-खासगी सहभागातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक व्हाया बीकेसी अशी ही पॉड टॅक्सी 8.8 किमी अंतरावर धावणार आहे. बीकेसीतील एमटीएनएल जंक्शन ते कुर्ला रेल्वे स्थानक प्रवास बेस्ट बसने करण्यासाठी 25 ते 30 मिनिटे लागतात. पण सहा प्रवाशी क्षमतेच्या पॉड टॅक्सीने हे अंतर केवळ पाच मिनिटात पार करणे शक्य होणार आहे. अशा या पॉड टॅक्सीच्या मार्गिकेच्या बांधणीसाठी, पॉड टॅक्सीचे संचलन आणि देखभाल करण्यासाठी 6 मार्चला निविदा प्रसिद्ध केली आहे. नुकतेच निविदेचे दस्ताऐवज प्रसिद्ध करण्यात येणार होते. मात्र काही कारणाने यास विलंब झाला असून आता 26 मार्चला निविदा दस्ताऐवज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निविदानुसार 12 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान इच्छुक कंपन्यांना निविदा सादर करता येणार होत्या. पण आता मात्र यास अंदाजे 15 दिवस ही प्रक्रिया पुढे जाणार आहे.

COMMENTS