Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केदारनाथ मार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू

मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश ; दगड कोसळल्याने अपघात

रुद्रप्रयाग : केदारनाथच्या पायी मार्गावर रविवारी दुर्घटना घडल्याने महाराष्ट्रातील दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. या मार्गावर मार्गावर दगड-माती को

मुख्यमंत्र्यांना चेष्टा-मस्करी करण्याची सवय… नाना पटोलेंची मिश्किल प्रतिक्रिया
भ्रष्टाचार चा आवाज उठविणाऱ्या जितेंद्र भावें यांचे पक्षाकडून निलंबन 
काल्याच्या कीर्तनाने वीरभद्र महाराज यात्रेची सांगता

रुद्रप्रयाग : केदारनाथच्या पायी मार्गावर रविवारी दुर्घटना घडल्याने महाराष्ट्रातील दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. या मार्गावर मार्गावर दगड-माती कोसळल्याने अनेकजण जखमी झाले आहेत. तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आठ जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमधील भाविकांचा समावेश आहे.
गौरीकुंडपासून तीन किमी अंतरावर चिरवासा येथे बांधलेल्या पदपथावरून हे यात्रेकरू केदारनाथ धामकडे जात असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दगड पडला. रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नंदन सिंह राजवार यांनी अपघाताची माहिती दिली आहे. राजवार म्हणाले की, मृतांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथील किशोर अरुण परते, जालना येथील सुनील महादेव काळे आणि रुद्रप्रयाग येथील अनुराग बिष्ट यांचा समावेश आहे. अपघातानंतर एसडीआरएफच्या पथकांनी ढिगार्‍याखालून 8 जणांची सुटका केली. हे सर्व जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येत्या 48 तासांत उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. कुमाऊं क्षेत्रासाठी रेड अलर्ट तर गढवाल भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 21 जुलै रोजी चंपावत, नैनिताल आणि उधम सिंह नगरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पौरी, पिथौरागढ, बागेश्‍वर आणि अल्मोडा येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय डेहराडूनसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

COMMENTS