Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूरमधील आगीत तिघांचा होरपळून मृत्यू

लातूर ः शहरातील छत्रपती शिवाजी चौकाजवळील ’शिवाई’ नावाच्या चार मजली इमारतीला गुरूवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत

उदगीर येथे बसस्थानकात प्रवाशांचे प्रचंड हाल
बारामतीचा बदलता इतिहास मोठ्या आकाराच्या पडद्यावर दाखविण्याच्यादृष्टीने नियोजन करा : उपमुख्यमंत्री पवार
पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी पुढाकार घ्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

लातूर ः शहरातील छत्रपती शिवाजी चौकाजवळील ’शिवाई’ नावाच्या चार मजली इमारतीला गुरूवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.  कुसुमबाई शिवाजी लोंढे (वय, 80), सुनिल लोंढे (वय, 58) आणि प्रेमिला सुनिल लोंढे (वय, 50) असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर, अजरा सय्यद, जिनत फातेमा आणि फहाद अशी जखमींची नावे आहेत. लातूर शहरात छत्रपती शिवाजी चौकाजवळील ’शिवाई’ नावाच्या चार मजली इमारतीला आज सकाळी इमारतील आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस प्रशासन आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या इमारतीच्या तळ मजल्यावर मंडप डेकोरेशनचे दुकान आहे. शॉर्ट सर्कीटमुळे या दुकानाला आग लागली. दुकानात ज्वलनशील वस्तू असल्याने आगीने लगेच रौद्ररूप धारण केले. या घटनेने लातूर शहरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

COMMENTS