Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणच्या खाजगीकरणाविरुद्ध तीन दिवसांचा संप सुरु ; अहिल्यानगरमध्ये धरणे आंदोलन सुरु

अहिल्यानगर :  राज्यातील वीज कंपन्यांमध्ये सुरु असलेले खासगीकरणासह इतर धोरणात्मक मागण्यासाठी राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्

राज्‍यात तंत्रशिक्षण महाविद्यालयांचे महत्‍वपूर्ण योगदान -उदय सामंत
व्यापार्‍यांनी केला आ. आशुतोष काळेंचा सत्कार
नगरच्या मध्यवस्तीतील दोन घरे चोरट्यांनी फोडली
Displaying IMG_20251009_130835.jpg

अहिल्यानगर :  राज्यातील वीज कंपन्यांमध्ये सुरु असलेले खासगीकरणासह इतर धोरणात्मक मागण्यासाठी राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या वतीने खाजगीकरण, पेन्शन लागू करणे व इतर प्रलंबित विषयांवर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कृती समितीच्या वतीने ३ दिवसांचा संप पुकारण्यात आला. संपात सुमारे ७ संघटनेने सहभाग नोंदवला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, सबॉर्डीनेट इंजिनियर असोसिएशन (म.रा.वि.मं.), महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, तांत्रिक कामगार यूनियन या संघटनांनी संपात सहभाग घेतला आहे. यावेळी खासगीकरणासह महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवाना देण्यास विरोध, महावितरण कंपनीचे ३२९ उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालविण्यास देण्यास विरोध, त्याचबरोबर महापारेषण कंपनीमधील रु. २०० कोटीच्या वरील प्रकल्प TBCB माध्यमातून भांडवलदारांना देण्यास विरोध व महापारेषण कंपनीचा शेअर मार्केट मध्ये IPO च्या माध्यमातून लिस्टिंग करण्यास विरोध यांसह विविध मागण्या कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी महेश चाबुकस्वार, धीरज गायकवाड, राजेंद्र घोरपडे, सुशील तायडे, गणेश कुंभारे, गायकवाड डी.एस., राहुल वरंगटे, म्हस्के विजय, अनिल कुमार रोकडे, सतीश भुजबळ, धीरज भिंगारदिवे, रघुनाथ लाड आदींसह अभियंते, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS