Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या मध्यवस्तीतील दोन घरे चोरट्यांनी फोडली

अहमदनगर/प्रतिनिधी ः कुटूंबासह पुणे येथे रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या व्यावसायिकाचे व त्यांच्या घराच्या वरील मजल्यावर राहणार्‍या त्यांच्या मावशी

गटसचिवांना जिल्हा बॅंकने वैदयकिय विमा सुरक्षा कवच दयावे : कोल्हे
बोकड कापण्याच्या सुर्‍याने तरुणावर जीवघेणा हल्ला
सततच्या लॉकडाउनला भाळवणीकर वैतागले, व्यापारी वर्गात प्रशासनाविरुद्ध संताप

अहमदनगर/प्रतिनिधी ः कुटूंबासह पुणे येथे रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या व्यावसायिकाचे व त्यांच्या घराच्या वरील मजल्यावर राहणार्‍या त्यांच्या मावशीचे घर चोरट्यांनी फोडले. दोन्ही ठिकाणच्या घरफोडीत सुमारे दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने, संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम सात हजार असा 88 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. 7 ते 11 मार्च दरम्यान तेलीखुंट परिसरात ही घटना घडली असून 12 मार्च रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. सुफी रशिद सय्यद (वय 55, रा. तेलीखुंट) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीचा घड्याळ दुरुस्तीचा व्यवसाय आहे. ते तेलीखुंट परिसरात राहतात. त्यांच्या घराच्या वरील मजल्यावर त्यांच्या मावशी शबाना शौकत तांबोळी राहतात. फिर्यादी 7 मार्च रोजी कुटूंबासह पुणे येथे उपचारासाठी रुग्णालयात गेले होते. त्यांच्या मावशी सध्या मुकुुंदनगर येथे राहात असल्याने ही दोन्ही घरे बंद होती. चोरट्यांनी दोन्ही घरे फोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, संसारोपयोगी साहित्य व घड्याळे चोरून नेले आहे. 11 मार्च रोजी फिर्यादी पुणे येथून घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस अंमलदार शेख तपास करीत आहेत.

COMMENTS