Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानपरिषदेसाठी भाजपकडून तिघांना उमेदवारी

निरंजन डावखरे, शिवनाथ दराडे आणि किरण शेलार यांना संधी

मुंबई ः लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. भाजप विधानपरिषदेच्या तीन जागा लढणार असून, या तीनही जागांवरील उमेदवा

काकडी विमानतळाच्या नाईट लँडिगचा प्रश्‍न सुटला
तालिबान्यांचे समर्थन करणाऱ्यांना नाकारा- राष्ट्रीय मुस्लीम मंच
मुख्यमंत्र्यांनी तात्काळ नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे

मुंबई ः लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. भाजप विधानपरिषदेच्या तीन जागा लढणार असून, या तीनही जागांवरील उमेदवार भाजपने सोमवारी जाहीर केले. मुंबई शिक्षक व पदवीधरसहित कोकण पदवीधरवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
यामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपने निरंजन डावखरेंना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार यांना संधी देण्यात आली आहे. रमेश कीर यांना कोकण पदवीधर मधून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी कोंकण पदवीधर मतदारसंघ निवडणूकीकरिता उमेदवारी अर्ज घेतला आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून निरंजन डावखरे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

COMMENTS