Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामेश्‍वरच्या त्रिवेणी संगमावर तिघा भावांचा बुडून मृत्यू

जळगाव : पहिल्याच श्रावण सोमवारी श्रीक्षेत्र रामेश्‍वर येथे दर्शनासाठी गेलेल्या एरंडोल शहरातील तिघा चुलत भावांचा त्रिवेणी संगमावर बुडून मृत्यू झाल

लातुरात आता पशुरोग निदान प्रयोगशाळा
हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावरून पडल्याने हैदराबादच्या मुलीचा मृत्यू
राज्यात 75 नाट्यगृहेे उभारणार ः मंत्री मुनगंटीवार

जळगाव : पहिल्याच श्रावण सोमवारी श्रीक्षेत्र रामेश्‍वर येथे दर्शनासाठी गेलेल्या एरंडोल शहरातील तिघा चुलत भावांचा त्रिवेणी संगमावर बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. सायंकाळपर्यंत दोघांचे मृतदेह हाती लागले होते, मंगळवारी पुन्हा एका शोधमोहीम सुरू होती. एरंडोल येथील रहिवासी तरुण सागर अनिल शिंपी (वय 24), पियुष रवींद्र शिंपी (वय 23), अक्षय प्रवीण शिंपी (वय 24) असे मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. श्रावण सोमवारचे निमित्त साधून जळगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र रामेश्‍वर येथे दर्शनासाठी गेले होते. दुपारी ते त्याठिकाणी पोचले. अंजनी, तापी, गिरणेच्या संगमावरील या क्षेत्राचे पावित्र्य व विशेष महत्त्व आहे. त्यामुळे हे तरुण दर्शनाआधी संगमावर स्नान करण्यासाठी म्हणून नदीपात्रात उतरले. त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला.

COMMENTS