मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल बॉम्बने उडण्याची धमकी देणार्याला गुजरातमधील मोर्बी येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई पो
मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल बॉम्बने उडण्याची धमकी देणार्याला गुजरातमधील मोर्बी येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यालयातील दूरध्वनीवर फोन करून, सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. ही शाळा बॉम्ब उडवून देणार, अशी धमकी त्या व्यक्तीने दिली होती.
शाळा व्यवस्थापनाने लगेचच ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शाळेच्या परिसराची तपासणी केली. मात्र, ही धमकी अफवा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भादंविच्या कलम 505 (1) (ब) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला व तपासाला सुरुवात केली. घटनेनंतर काही वेळातच पोलिसांना कॉल नेमका कुठून आला आहे याचा सुगावा लागला. त्यानुसार पुढील कारवाईला सुरुवात झाली. अखेर मोर्बी येथून पोलिसांनी संबंधित इसमाला अटक केली. विक्रम सिंह असे या आरोपीचे नाव असून तो 35 वर्षांचा आहे. त्याची अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
COMMENTS