Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलांना चांगले आणि विविध क्षेत्रातील शिक्षण देणे गरजेचे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड प्रतिनिधी - बदलत्या काळात आता शिक्षण क्षेत्रात विविध विषयांवर शिक्षण व्यवस्था उपलब्ध झाली आहे केवळ ठराविक विषयात शिक्षण न घेता चांगले आणि विव

माझा कुठलाही राजकिय निर्णय नाही-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
आण्णाभाऊ साठेंचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
मतदारांचा मूड बदलला; आता बदल काळाची गरज-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड प्रतिनिधी – बदलत्या काळात आता शिक्षण क्षेत्रात विविध विषयांवर शिक्षण व्यवस्था उपलब्ध झाली आहे केवळ ठराविक विषयात शिक्षण न घेता चांगले आणि विविध क्षेत्रातील शिक्षण मुलांना देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
जय संताजी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ श्रीक्षेत्र रामेश्वर मंदिर, काकू मळा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब, माजी प्राचार्य मन्मथआप्पा हेरकर, बबनराव गोरे, सुभाष क्षीरसागर, अरुण बरकसे, उद्धव क्षीरसागर, राजेंद्र बनसोडे, आत्माराम पवार, डॉ.अरुण भस्मे, डॉ.राजा मचाले, रामेश्वर पवार, प्रशांत शिंदे, रघुनाथ राऊत, देवीदास एकशिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, दिवसेंदिवस शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. केवळ डॉक्टर, इंजिनियर न होता आता इतर क्षेत्रातही विद्यार्थी प्राविण्य मिळू लागले आहे त्यामुळे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना चांगले आणि विविध क्षेत्रातील शिक्षण देणे गरजेचे आहे. उच्च शिक्षणात आता महिलांचाही सहभाग वाढला आहे, नुकतेच चंद्रयान तीन हे यान चंद्रावर पोहोचले आहे संशोधन क्षेत्रात या कामगिरीत जवळपास 100 महिलांचा सहभाग आहे. ही प्रेरणा घेऊन समाजातील मुलींनी देखील पुढे जाणे महत्त्वाचे आहे. सध्या कोणतेही क्षेत्र कमी नाही ज्या क्षेत्राची निवड केली त्यातून यश संपादन करण्यासाठी जिद्द, मेहनत करावी लागते. बीड जिल्ह्यातील विद्यार्थी हा परिश्रम घेणार आहे भविष्य घडवण्यासाठी मोठमोठ्या शहरात जाऊन मोठी धडपड चालू असते आणि यश मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात याचे कौतुक करावे तितके कमी आहे. समाजाने एक संघ राहून समाजाच्या कार्यक्रमात योगदान द्यायला हवे. नवीन उभारणी होत असणार्या मंदिराच्या सभागृहात पुढचा कार्यक्रम व्हावा यासाठी समाज बांधवांनी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे. संताजी जगनाडे महाराज मंदिराची उभारणी करणे म्हणजे वारकरी सांप्रदायाचे वैभव उभारण्यासारखे आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा जतन करून ठेवण्याचे काम संत जगनाडे महाराज यांनी केले, तेली समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या सदुंबरे येथे 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून याचे कामही आता सुरू होणार आहे ही समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रयत्न करावे लागतात तेव्हा यश मिळत असते सत्ता असो अथवा नसो सातत्याने पाठपुरावा करून योजना किंवा निधी मंजूर करून ती कामे सुरू करावी लागतात असे सांगून त्यांनी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज रायते या तरुणाने संत जगनाडे महाराज आणि जयदत्त आण्णा यांच्यावर तयार केलेले गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवलिंग क्षीरसागर यांनी केले. यावेळी समजाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS