मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्तेत सध्या दगड असले असून, राजकारणात प्रभू श्रीरामाचे नाव घेवून दगड तरंगत आहेत, पण त्या दगडांना पाण्यावर तरंगण्यासाठ
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्तेत सध्या दगड असले असून, राजकारणात प्रभू श्रीरामाचे नाव घेवून दगड तरंगत आहेत, पण त्या दगडांना पाण्यावर तरंगण्यासाठी ठेवले नसून, त्या दगडावर पाय देवून लंका जिंकणे आपला उद्देश आहे. शिंदे गटाने जरी काही काळाकरिता धनुष्यबाण मिळवला असला तरीही प्रभू श्रीराम माझ्यासोबत असल्याची टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. रामटेक येथून ठाकरे गटाचे पाठीराखे आज मातोश्रीवर रामनवमीच्या दिवशी पोहचले. खास उद्धव ठाकरे यांच्यासाठी ते पायी निघाले होते. यानंतर त्यांचे आभार मानत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी तसेच विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, कुणीतरी कुणासाठी एवढे किलोमीटर पायपीट करून येणे हे आजच्या काळात अशक्य आहे, पण तुम्ही माझ्यासाठी येथे आलात. तुम्हाला मातोश्रीत यावे व माझ्यासोबत उभे राहो असे वाटले हा रामाचा आशीर्वाद आहे असे मला वाटते. कारण तुम्ही रामटेवरून निघाला आणि बरोबर रामनवमीला पोहचला. राममंदिरातून तुम्ही निघाला होतात हेही महत्वाचे आहे. ठिक आहे.. काही काळाकरीता धनुष्यबाण जरी त्यांनी (शिंदे गटाने) मिळवला तरीही प्रभू राम माझ्यासोबत आहेत. मला चिंता कधीच नव्हती पण एक लक्षात घ्या की, आता माझे जे लोकशाही वाचवण्याबाबत कौतूक केले हे माझे एकट्याचे नाही तर सर्वांचे काम आहे. रामसेतू बांधताना वानरसेना होतीच पण घारही होती. घारीनेही कार्य केले होते. तिच्यासारखाच प्रत्येकाने मी काय करू शकतो याचा विचार करायचा आहे. आपण सर्व एकत्र आलो तर लंका दहन करू शकतो. उद्धव ठाकरे म्हणाले, आता राजकारणात प्रभू रामाचे नाव घेवून दगड तरंगत आहेत, पण त्या दगडाला तरंगण्यासाठी नेले नाही तर दगडावर पाय देऊन स्वारी करायची आहे. सध्या दगड सत्तेत बसले आहेत. रामभक्तांचे काम मला कार्यकर्त्यांकडून अपेक्षित आहेत. देशाचे स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. त्या लोकांनी बलिदान देवून मिळवलेले स्वातंत्र्य आपण अबाधित राखण्याचे काम करायला हवे. मी संविधानाचे रक्षण करायचे हा आपण ’पण’ मनात बांधा. तुम्ही सर्वजण सोबत आहात तीच माझी ताकद असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
COMMENTS