सिटी स्कॅन केंद्रांवर नागरिकांची तोबा गर्दी ; कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांची रिपोर्टसाठी झुंबड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिटी स्कॅन केंद्रांवर नागरिकांची तोबा गर्दी ; कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांची रिपोर्टसाठी झुंबड

संगमनेर शहरात दिवसागणिक शेकडोंच्या संख्येने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

बायोडिझेलचा वाहनांत इंधन म्हणून वापर करणर्‍या तिघांविरुद्ध गुन्हा
राहुरीतील शिंदे गटाच्या 28 पदाधिकार्‍यांचे सामुहिक राजीनामे
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्रांतीमध्ये मोठे योगदान

संगमनेर/प्रतिनिधी : संगमनेर शहरात दिवसागणिक शेकडोंच्या संख्येने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यात एकट्या एप्रिल महिन्यात ४ हजार सातशे ५९ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या साधी लक्षणे असलेला रुग्णही खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेला असता त्याला डॉक्टरांकडून सर्वप्रथम आरटीपीसीआर आणि एचआरसीटी या दोन चाचण्या करण्यास सांगण्यात येते. त्यामुळे कोरोना बाधित आणि कोरोना संशयित असे दोनही प्रकारचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सिटी स्कॅन केंद्रावर जात आहेत. 

 परिणामी या केंद्रांवर नागरिकांची प्रचंड गर्दी आणि रुग्णांची हेळसांड होत आहे. यावेळी सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाल्याची परिस्थिती बघायला मिळत आहे. संगमनेर शहरात फक्त दोनच खाजगी सिटी स्कॅन केंद्र आहेत. याठिकाणी संपूर्ण तालुक्यासह अकोले आणि आसपास च्या इतर तालुक्यातून रुग्ण सिटी स्कॅन करण्यासाठी येतात. याठिकाणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तासंतास उन्हातान्हात लाईनीत उभे राहून आपल्या क्रमांकाची वाट बघावी लागते. खाजगी सिटी स्कॅन केंद्र चालक याठिकाणी गर्दी नियंत्रणात राहावी किंवा सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे यासाठी कोणत्याही उपाय योजना करताना दिसत नाही. एका एचआरसीटी स्कॅनची तब्बल अडीच हजार रुपये आकारली जात असतानाही नागरिकांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील गर्दीचे नियोजन करावे आणि खाजगी सिटी स्कॅन केंद्र चालकांकडून आकारली जाणारी भरमसाठ फी कमी करावी, अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहे. 

कोट 

“सिटी स्कॅन केंद्रांवर होणारी गर्दी बघता यापुढे डीसीएचसी (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) येथील डॉक्टर, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या चिठ्ठी वरून एचआरसिटी स्कॅन अहवाल रुग्णांना देण्यात येईल. तसेच केंद्र चालकास दिवस भरातील संपूर्ण एचआरसीटी चे अहवाल जिल्हा ग्रामीण रुग्णालय अधिक्षकांना देण्याचे बंधनकारक राहील. याशिवाय केंद्रावर गर्दी झाल्यास आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल.”– अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर.

 कोट 

संगमनेर शहरात सिटी स्कॅन केंद्रांवर आलेल्या रुग्णांकडून प्रत्येकी अडीच हजार रुपये आकारले जात आहेत. लोकडाऊनच्या काळात गरीब जनतेच्या रोजीरोटीचा प्रश्न असताना केंद्रचालकांकडून अशा पद्धतीने पैशांची लूट होणे योग्य नाही. माझी प्रशासनाला विनंती आहे कि किमान गरीब जनतेला या अवाजवी शुल्क आकारणीतून काही तरी सवलत मिळावी.“- अमर कतारी, शिवसेना शहर प्रमुख, संगमनेर.  

COMMENTS