Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विश्वात सौंदर्य पाहतात, तेच खरे संत – डॉ. गुट्टे महाराज 

नाशिक प्रतिनिधी - संत सदैव प्रभूचे स्मरण चिंतन करीत असतात. संत मनाला कधीही आसक्त होऊ देत नाही. संत त्यालाच म्हणतात की जे विश्वात सौंदर्य पाहतात अ

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सामुहीक प्रयत्नाची गरज : विवेकभैया कोल्हे.
झोपडपट्टी उजळवण्याचे गाजर !
संगमनेरात पोलिस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

नाशिक प्रतिनिधी – संत सदैव प्रभूचे स्मरण चिंतन करीत असतात. संत मनाला कधीही आसक्त होऊ देत नाही. संत त्यालाच म्हणतात की जे विश्वात सौंदर्य पाहतात असे विचार श्री सिध्दी विनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक अध्यक्ष भागवताचार्य डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले. पंचवटीतील अमृतधाम, हनुमान नगर येथील भक्ती  महिला भजनी मंडळातर्फे सुरू असलेल्या  

संगीतमय भागवत कथेचा समारोप झाला.  त्यावेळी ते बोलत होते.  डॉ गुट्टे महाराज यांनी सांगितले की,शरीर हे ज्ञान व भक्ती प्राप्त करण्याचे साधन आहे. म्हणून ते श्रेष्ठ आहे. सुखदुःख तर मनाची कल्पना असते. सदगुणाने जो संपन्न आहे तोच खरा श्रीमंत आहे. साधना केल्याने चित्त शुद्ध होते. चित्तशुद्धीसाठी माणूस नाना तऱ्हेचे साधने करीत असतो.कोणी मौन, ध्यान, धारणा, जप, तप करीत असतो.त्याच पद्धतीने साधना केली तर जग विकृत दिसत नाही. मन अशुद्ध असल्यामुळे जग विकृत वाटते. या जगात ज्ञान व अज्ञानही आहे. ज्यांच्या कडे ज्ञानाची दृष्टी आहे , त्यांना हे जग आनंददायी वाटते. परंतु ज्यांच्याकडे अज्ञान आहे, त्यांना दुःखदायी  संसार वाटतो. ज्ञानाच्या कक्षेत चित्त शुद्ध असते. तर आज्ञानाच्या कक्षेत चित दुःखच भोगत असते. यावेळी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणींचा विवाह उत्साहात पार पडला. तसेच श्री कृष्णाचे परम भक्त सुदामा चरित्र सांगत असताना भाविकांचे आश्रू अनावर झाले. यावेळी भाविकांनी आपल्याला कथेत आलेले अनुभव सांगितले. अनेक महिलांनी अनेक भावगीतांवर  ठेका धरला. 

परिसरातून सवाद्य ग्रंथ मिरवणूक – कथेनंतर परिसरातून सवाद्य ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी मिरवणूक मार्गात आकर्षक सडा रांगोळी काढली होती. ठीक ठिकाणी पालखी अन् डॉ गुट्टे महाराजांचे पूजन करण्यात आले.  शहर , परिसरातील शेकडो भाविक सहभागी झाले होते.

COMMENTS