Homeताज्या बातम्या

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला ईडीचे पुन्हा समन्स

मुंबई : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिच्या अडचणीत वाढ झाली असून. ईडीने तिला पुन्हा समन्स बजावले असून 19 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे विचार समाजाला प्रेरणादायी
महिला क्रिकेट संघाच्या बसला भीषण अपघात
32 कोटींचा तो विषय ठेवला राखून, स्मशानभूमीचा नवा प्रस्ताव आणणार

मुंबई : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिच्या अडचणीत वाढ झाली असून. ईडीने तिला पुन्हा समन्स बजावले असून 19 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. टॉलिवूड ड्रग्ज मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने रकुलला समन्स बजावले आहे. ईडीने रकुलला 19 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीने टॉलिवूड ड्रग्ज मनी लाँडरिंग प्रकरणात सप्टेंबर महिन्यात रकुलला चौकशीसाठी बोलावले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने रकुल, राणा दुग्गुबती यांच्यासह अनेक टॉलिवूड कलाकारांची हैदराबाद येथे चौकशी केली आहे. त्यावेळी ईडीच्या अधिकार्‍यांनी रकुलची सुमारे अडीच तास चौकशी केली होती. हे प्रकरण 40 वर्षे जुने ड्रग्सशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी इतर अनेक कलाकारांनाही समन्स बजावण्यात आले होते. तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने 2017 मध्ये 30 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणी ईडी अधिकार्‍यांनी आरोपपत्र दाखल केले.

COMMENTS