यंदा सगळे सण निर्बंधाविना होणार साजरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदा सगळे सण निर्बंधाविना होणार साजरे

गणेशोत्सव-दहीहंडी, मोहरम उत्सवावरील निर्बंध हटवले ; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी :राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सव-दहीहंडी उत्सवांवर अनेक निर्बंध होते. तसेच हिंदूच्या सण उत्सावांवर

दोन वर्ष गतीमान राहून ध्येयापर्यंत पोहचा ः कुलगुरू डॉ.काळकर
सहकार क्षेत्र संपविण्याच केंद्र सरकारच षडयंत्र… शरद पवारांचा आरोप
फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जातीयवाद फोफावला का ? l पहा LokNews24

मुंबई/प्रतिनिधी :राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सव-दहीहंडी उत्सवांवर अनेक निर्बंध होते. तसेच हिंदूच्या सण उत्सावांवर निर्बंध तर मुस्लिम बांधवांच्या सण-उत्सवांना सूट अशी ओरड गेल्या दोन वर्षांपासून होत होती. मात्र यंदा राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव व दहीहंडी व मोहर्रम उत्सव विना निर्बंध साजरे करण्याची घोषणा केली. माध्यमांना संबोधित करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोविड काळात सण-उत्सवाला मर्यादा होत्या; पण यंदा मंडळांचा उत्साह आहे. हे लक्षात घेता गणेशोत्सव, दहिहंडी, मोहर्रम हे सण धडाक्यात साजरे व्हावेत याबाबत बैठकीत चर्चा झाली. यात कायदा सुव्यवस्था राखून शांततेत उत्सव व्हावे म्हणून सर्व प्रशासन, जिल्हा आणि पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, व्यवस्थित आणि सुरळीत उत्सव पार पडावे यासाठी विसर्जन मार्गातील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. मंडप आणि अन्य परवानगी सुरळीत मिळावी यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करत आहोत. अटी-शर्थी लावू नये, असे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज काही महत्त्वाचे निर्णय मुख्यमंमत्र्यांनी घेतले आहेत. गणेश उत्सवाबाबत समन्वय समितीसोबत बैठक झाली. मूर्तिकारांच्या प्रतिनिधींचाही यात समावेश होता. त्यांच्या मागण्या समजून घेत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहेत. कोविड काळात गणेश उत्सव साजरा करता आला नाही. हे लक्षात घेत आम्ही सकारात्मक निर्णय घेतले आहेत, असे फडणवीस म्हणाले.

गणेश मूर्तीच्या उंचीवरील मर्यादा हटवली
गणेश मंडळांना नोंदणी शुल्क आणि अनावश्यक शुल्कातून सुट दिली गेली. हमीपत्रही आता गणेश मंडळांकडून घेणार नाही. उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी, समाजप्रबोधनाचे नियम पाळावेच, पण त्याचे अवडंबरही प्रशासनाकडून होता कामा नये अशा सूचना मी दिल्या. कोविड काळात गणेश मूर्तीच्या उंचीवर मर्यादा होती ती आता काढून टाकली आहे. सर्व अधिकारी, प्रशासनाने सकारात्मक भूमिका गणेशोत्सव साजरा करताना घ्यावी. विसर्जन घाटावर आणि विसर्जन मार्गावर लाइट व्यवस्था केली जाणार आहे.

मुंबईच्या हितासाठीच मेट्रो कारशेडचा निर्णय : फडणवीस
उपमुख्यंत्री फडणवीस आरे कारशेडबद्दल आपली भूमिका स्पष्ट करतांना म्हणाले की, मविआ उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात गेले. जी झाडे कापली ती पूर्ण जीवनकाळात जेवढे कार्बन उत्सर्जित करतात, तेवढे कार्बन मेट्रो 80 दिवसांत करेल. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी व्हावे हे आमचे धोरण आहे. आम्ही काम सुरू केले तेव्हा आंदोलन झाले नाही, पण 25 टक्के काम झाल्यानंतर विरोध सुरू झाला. पर्यावरणवाद्यांचा आम्ही आदर करतो, पण मुंबईच्या हितासाठी आम्हा मेट्रो कारशेडचा निर्णय घेतला आहे. लोकलमुळे अपघात होतात अशा प्रवाशांसाठी आमची लाइफलाइन म्हणजे मेट्रो प्रकल्प आहे.

COMMENTS