Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकार कोसळण्याच्या भीतीने हे बजेट सादर केलं आहे – संजय राऊत 

मुंबई प्रतिनिधी - आज ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे त्यामुळे शिवसेना प्रत्येक तहसील कार्यालयावरती जाऊन आंदोलन कर

संसद, लोकांच्या इच्छेचे मूर्त स्वरूप !
चौदा बालकांची विक्री करणार्‍या टोळी जेरबंद
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक

मुंबई प्रतिनिधी – आज ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे त्यामुळे शिवसेना प्रत्येक तहसील कार्यालयावरती जाऊन आंदोलन करत आहे. तात्काळ पंचनामे करा, तात्काळ मदत करा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. 

कुणी कुणाच्या वाटेला गेलं नाही. त्यांच्या वाटेला जाणे इतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार मुख्यमंत्रीपद का गेलं हे पुर्ण जगाला माहित आहे. त्यांना जर माहीत नसेल तर त्यांच्या पक्षाची अजून व्यवस्थित वाढ होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे सरकार हे फक्त ईडी सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं आणि जोडीला खोके.इडी चा अनुभव हा त्यांनी चांगल्या प्रकारे घेतला आहे. 

महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारनं आणि केंद्रातल्या सरकारने जात आणि धर्मावर राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्राची ही परंपरा नव्हती. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी तुम्ही जात दाखवाल अशा प्रकारचा जात दाखवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असेल तर शेवटी महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला त्यांचा धर्म दाखवावा लागेल.

कसब्याच्या निकालात जनता कुठे गेली हे दिसलं नेत्यांचं काय घेऊन बसलात काल महाविकास आघाडीची बैठक झाली. सगळ्यांनी काही भूमिका आणि निर्णय ठरवले आहेत आणि ते असे आहेत की कोणत्याही परिस्थितीत लोकसभा आणि विधानसभा या एकत्रित मजबुतीने लढायच्या आणि भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवायची हे ठरला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या पक्षाची अधोगती कशी चालली आहे यावर लक्ष द्यावं. 

सरकार कोसळण्याच्या भीतीने हे बजेट सादर केलं आहे.  कदाचित हे त्यांचं शेवटचं बजेट असेल. ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आम्हाला सर्वांना खात्री आहे की घटनेनुसार काम झालं. निर्णय लागला तर सुरुवातीचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि त्यानंतर हे सरकार कोसळेल अशी परिस्थिती आहे आणि हे सरकार कोसळल तर लोकांमध्ये जाण्यासाठी काही भूमिका हव्यात म्हणून हे बजेट सादर केलं. 

हा डरपोकपणा आहे आम्ही रोज सांगतो निवडणुका घ्या विरोधी पक्ष कधीच सांगत नाही की निवडणुका घ्या आणि एकदा आमने-सामने होऊ द्या शिवसेना कोणाची महाराष्ट्र कोणाचा हा फैसला होऊन जाऊ दे.

COMMENTS