Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांच्या हिताची संपुर्ण माहिती त्यांना मिळावी-शरद झाडके  

केज वार्ताहर - शेतकर्‍यांधील नैराश्याची कारणे शोधून त्या आधारे शेतकरी आत्महत्या  थांबविण्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी केज तालु्क्यातील सर्व गा

संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत संघचालकपदी नानासाहेब जाधव
रिलायन्सची अनैतिक व्यापार संधी !
नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

केज वार्ताहर – शेतकर्‍यांधील नैराश्याची कारणे शोधून त्या आधारे शेतकरी आत्महत्या  थांबविण्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी केज तालु्क्यातील सर्व गावांतील शेतकर्‍यांच्या आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक सुरक्षितेबाबत पाहणी केली जात आहे. सचीन देशपांडे यांच्या शेतात आयोजित बैठकीत शरद झाडके यांनी सांगितले की , प्रत्येक  घरी जाऊन प्रत्येक शेतकरी कुटुंबातील  माहितीचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी गावनिहाय कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शी शरद झाडके साहेब उपविभागीय आधिकारी अंबाजोगाई यांनी दिली.  केज तालु्क्यातील सर्व  गावांतील शेतकर्‍यांच्या आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक सुरक्षितेबाबतची पाहणी केली जाणार आहे याची सुरुवात आज केज येथे करण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी शरद झडके यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन व आवाहन  केले की सर्वानी आपली माहिती भरावी माहिती देण्यास टाळाटाळ करु नये यावेळी प्रभारी तहसीलदार सचिन देशपांडे व शेतकरी पशुपतिनाथ दांगट, समीर देशपांडे, महादेव सूर्यवंशी, बाळासाहेब ठोंबरे, दिनकर राऊत, मगदूम साहेब, संदीप राऊत, गणपत राऊत, संजू लोंढे, किसन ननवरे, अभिमान राऊत, युवराज डाबरे, नाना गुंड, सिद्धू कदम, अशोक सत्वधर, सोमनाथ सत्वधर, सतीश दांगट, सोनू देवकते, प्रवीण, प्रदीप कदम व तहसील येथील कर्मचारी उपस्थित होते तसेच माने मच्छिंद्र गणेश डाबरे उमेश बावरे शीकांत हजारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिशम घेतले प्रत्येक शेतकर्‍यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष कुटुंबाची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक शेतकरी कुटुंबाचा एक स्वतंत्र तपासणी फॉर्म भरून घेण्यात येत आहेत. याकामांवर मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी हे पर्यवेक्षक आहेत. शेतकर्‍यांची माहितीचे फॉर्म बळीराजा अ‍ॅप मध्ये अपलोड करण्यात येणार आहेत. या पाहणीद्वारे शेतकर्‍यांचे शिक्षण, मुख्य व्यवसाय, 7-12 वरील बोजा, कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांची शैक्षणिक स्थिती, विवाह योग्य मुलींची संख्या, त्यांच्या विवाहासाठीच्या आर्थिक अडचणी, कर्ज किंवा इतर कारणांमुळे होणारे कौटुंबिक कलह, व्यसनाचे प्रकार, गंभीर दुर्धर आजाराचा प्रकार, बेरोजगारांची संख्या, नैसर्गिक संकटांमुळे निर्माण झालेल्या अडचणी, घरातील सुविधा, स्वतःचे घर, वीजजोडणी, नळजोडणी, स्वच्छतागृह या सुविधांची माहिती संकलित केली जात आहे.सद्य स्थितीतील बँकनिहाय घेतलेले कर्ज, कर्जाचा प्रकार, परतफेड, थकबाकी, नवीन कर्ज आदी तपशील आहे. शेतजमीन विषयक माहितीमध्ये एकूण जमिनी, कोरडवाहू, बागायती, हंगामी बागायती यासह मागील एका वर्षातील पिके व उत्पादन याचा समावेश आहे.  कृषी योजनांचा लाभ,पशुधन विषयक, स्थलांतर विषयक बाबीं, शेतकर्‍यांना शेती, पूरक व्यवसाय आदीतून मिळणारे याचा तपशील आहे. सामाजिक सहभाग विषयक माहितीमध्ये कुटुंबातील व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, असेल तर त्यातून मिळणार्‍या लाभाची माहिती, शेतकरी गटाचे सदस्य, धार्मिक कार्याची आवड याबाबत माहिती भरून घेतली जात आहेत. कल्याणकारी योजनांच्या लाभविषयक माहितीमध्ये दारिद्रेरेषेखालील पिवळे रेशन कार्ड, नरेगा जॉब कार्ड, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, जनधन योजना, संजय गांधी निराधार योजना आदींसह आरोग्य पोषण व शिक्षण विषयक माहितीचे संकलन आहे.  यावेळी बोलताना शरद झाडके म्हणाले की पंधरा दिवसांत सदरील माहिती गोळा करायची आहे प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकर्‍यांची माहिती गोळा करायची असल्यामुळे शेतकर्‍यांनी आपली संपूर्ण माहिती कर्मचार्‍यांना द्यावी माहिती देण्यास टाळाटाळ करु नये जेणे करून भविष्यकाळात शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत होईल तेव्हा शेतकर्‍यांनी आपली माहिती द्यावी असे आवाहन शरद झाडके यांनी केले.

COMMENTS