Ahilyanagar : राहुरी- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्यांनी आपापल्या भागात जबाबदारीने काम करावे. पक्षाचे सदस्य वाढविण्यासाठी प्रयत्न करा
Ahilyanagar : राहुरी- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्यांनी आपापल्या भागात जबाबदारीने काम करावे. पक्षाचे सदस्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. अधिवेशन संपताच आपण राज्याच्या काही भागाचा दौरा करणार असून राहुरी तालुक्यासाठी वेळ देईन. जे आज येऊ शकले नाही, त्यांनी त्यावेळी उपस्थित राहावे. राहुरी हे माझे आजोळ असल्याने राहुरीकडे यापुढे लक्ष देईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.
अरुण तनपुरे यांचा पक्षप्रवेश
मागील आठवड्यात डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे, युवा संचालक हर्ष तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार पक्षात प्रवेश केला होता. काल मुंबई येथील महिला विकास भवन येथे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री पवार यांचे हस्ते प्रवेश केला. यावेळी पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार धर्मराज आत्राम, डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे, संचालक हर्ष तनपुरे, तालुकाध्यक्ष दिलीप जठार, शहराध्यक्ष सुनील भट्टड आदि उपस्थित होते.
अनेकांचा पक्षप्रवेश
काल. डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक विजय डौले, प. स.चे माजी सभापती वेणुनाथ कोतकर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी उपाध्यक्ष दत्तात्रय पानसंबळ, अशोक विटनोर, मुळा प्रवरा वीज संस्थेचे माजी संचालक अय्युब पठाण, राहुरीचे माजी उपगराध्यक्ष प्रकाश भुजाडी इत्यादी.
यावेळी चेअरमन तनपुरे म्हणाले की, आज तालुक्याचे दृष्टीने आनंदाचा क्षण असून ना. अजितदादा व पक्षश्रेष्ठींनी आम्हाला पक्षात प्रवेश दिला. दादांचे राहुरी हे आजोळ असून त्यांचे यापूर्वी तालुक्याच्या विकास कामाना जशी मदत केली तशी यापुढेही करतील असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला.


COMMENTS