Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकाचा जीव धोक्यात घातल्याशिवाय समाजाचे कल्याण होणार नाही : जरांगे यांचे मत

मुंबई / प्रतिनिधी ः मराठा आरक्षणासाठी जालन्यातल्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. रविवारी उपोषणाचा पाचवा दिवस असून त

मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार
आरक्षण मिळाले नाही तर, आंदोलन तीव्र करणार
राजकोट किल्ल्यावर रविवारी जाणार ः मनोज जरांगे

मुंबई / प्रतिनिधी ः मराठा आरक्षणासाठी जालन्यातल्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. रविवारी उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांनी सरकारला चर्चेसाठी दारे खुली केली आहेत. दोन दिवस मी बोलू शकतो त्यामुळे दोन दिवसात काय बोलायचे ते बोला, असे जरांगे म्हणाले.

रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले, सरकारला आरक्षण द्यायचे नसेल तर मराठ्यांचा सामना करावा लागेल. कुणाचातरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचे कल्याण होणार नाही. माझ्या हृदयाला काहीही होणार नाही. माझे हृदय बंद पडले तर सरकारचेही हृदय बंद पडेल. मला काहीही झाले तरी मराठा समाज आंदोलन करणार आहे. चर्चेला येऊ देत नाहीत असे कारण देत सरकार आरक्षण देणार नाही. त्यामुळे दोन दिवस चर्चेसाठी मी तयार आहे. त्यानंतर मला बोलता येणार नाही. माझी बोलती बंद झाल्यावर रट्टे खाण्यासाठी येणार का? तुमचे कोण मातब्बर आहेत, त्यांना घेऊन या. मराठा समाज तुम्हाला काहीच बोलणार नाही. उलट तुम्हाला संरक्षण देईल.

एकप्रकारे सरकारला चर्चेसाठी आंतरवाली सराटीची दारे खुली झाली आहेत. त्यामुळे आज आणि उद्या (सोमवारी) मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकार कुणाला पाठवते? हे बघणे महत्त्वाचे आहे. राज्यातील हजारो गावांमध्ये साखळी उपोषणे सुरु आहेत. शिवाय पुढार्‍यांना गावबंदी केली आहे.

COMMENTS