भररस्त्यावर विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा

Homeताज्या बातम्यादेश

भररस्त्यावर विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा

भांडत असताना कारने उडवले दोन तरुणांना 

उत्तर प्रदेश प्रतिनिधी  - उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मधील  एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.व्हिडिओ मध्ये रस्त्यावर काही तरुण भांडताना दिसत आहेत. काह

शहाजीबापू पाटलांच तोंड गटारीसारखं 
आरक्षण प्रश्‍नावर सर्वपक्षीय बैठक बोलवा
यंदाही बारावीमध्ये मुलींची बाजी

उत्तर प्रदेश प्रतिनिधी  – उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मधील  एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.व्हिडिओ मध्ये रस्त्यावर काही तरुण भांडताना दिसत आहेत. काही विद्यार्थी घोळक्याने उभे असतात. त्यानंतर त्यातील काही विद्यार्थी एकमेकांचे गळे पकडतात. इतक्यात पांढऱ्या रंगाची एक कार येते आणि रस्त्यावरची मुलं बाजूला होतात. पण त्यातही दोन मुलांना ही भरधाव कार जोरदार धडक देते. कारची धडक इतकी भीषण असते की, मुलं थेट गाडीच्या काचेवरच आदळतात आणि रस्त्यावर कोसळतात. दरम्यान गाडीने धडक दिल्यानंतर रस्त्यावर कोसळलेले दोघेही जण रस्त्यावरुन उठून उभे राहतात आणि पुन्हा एकमेकांसोबत मारमारी करु लागतात. ही घटना मसुरी मधील असून तिथल्याच स्थानिक कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी एकमेकांमध्ये भिडले होते, अशी माहिती समोर आलीय. बीबीए आणि बीसीए कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा झाला असून हाणामारीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.

COMMENTS