कोपरगाव शहर प्रतिनिधी ः गेल्या मान्सून मध्ये कोपरगाव तालुक्यात अत्यंत अल्प किंबहुना पाऊसच न पडल्याने यंदाच्या उन्हाळ्यात सर्वत्र पाण्याचा दुष्काळ

कोपरगाव शहर प्रतिनिधी ः गेल्या मान्सून मध्ये कोपरगाव तालुक्यात अत्यंत अल्प किंबहुना पाऊसच न पडल्याने यंदाच्या उन्हाळ्यात सर्वत्र पाण्याचा दुष्काळ मानगुंटीवर बसला असून याची मोठी झळा कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागाला बसली असून येत्या काळात भीषण पाणी टंचाईचे संकेत निर्माण होण्याची शक्यता या भागातील आजच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे.
कोपरगाव तालुक्यास पूर्वीच्या काळी अत्यंत सुजलम सुफलाम कॅलिफोर्निया म्हणून संपूर्ण जगभर ओळखले जात असे परंतु गेल्या काही वर्षापासून पर्जन्यमान कमी होत चालल्याने तसेच कालव्याचे पाणी वेळेवर मिळत नसल्याने ही ओळख इतिहास जमा झाली असून यंदा तर पिण्याच्या पाण्याची देखील वनवा भासू लागल्याने शेतकर्यांसह नागरिक हवालदिल झाले आहे. कोपरगाव तालुक्यात गेल्या मान्सून मध्ये पाऊस कमी किंबहुना झालाच नसल्याने शेतकर्यांनी आपल्या विहिरीत असलेल्या पाण्यावर व पाटाच्या पाण्यावर कसे तरी पिके जगवली परंतु आता मार्च अखेर पासून उन्हाची तीव्रता अत्यंत वाढल्याने पिण्यासाठी पाणी राखून ठेवलेल्या विहिरीने तळ गाठली तर बोअरवेल देखील कोरडे ठाक पडल्याने येणार्या मे महिन्यात याची मोठी झळ मनुष्यासह जनावरांना देखील बसणार आहेच तर कोपरगाव शहराला सध्या 10 ते 15 दिवसातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे परंतु जर अशीच परिस्थिती राहिली तर येणार्या काळात म्हणजेच मे महिन्यात यात मोठी वाढ होऊ शकते? यात शंका नाही त्यामुळे तालुक्यातील पूर्व भागासाह शहराला मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई मे महिन्यात भासू शकते.त्यामुळे लवकरात लवकर कोपरगाव तालुक्यातुन वाहणार्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला त्वरित पाणी सोडण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
तालुक्यातील अनेक कुटुंब ही शेती व शेतीपूरक जोड धंद्यावर अवलंबून असून कमी पर्जन्यमानामुळे शेती तर उद्ध्वस्त झालीच परंतु पिण्याच्या पाण्याच्या वनवा मुळे शेती जोडधंदा देखील मोडकळीस आल्याने पूर्वीचा कॅलिफोर्निया मधील शेतकरी पिण्याच्या पाण्याला मौताल होतो की काय? अशी शंका वाटायला लागली आहे.
उत्तम चरमळ, शेतकरी-पढेगाव
COMMENTS