Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सौर ऊर्जा प्रकल्पाच्या साहित्याची उद्घाटनापूर्वीच चोरी

राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील घटना

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द ग्रामपंचायत येथील वांबोरी रस्त्यावर जवळील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील प्रांगणात उभारण्यात आलेल्य

राजकीय संघर्षात कुसडगाव एसआरपीएफ केंद्राचे लोकार्पण
शेतकर्‍यांवर बंदूक रोखणारे सरकार खाली खेचणार
शेतीसाठी वीज पुरवठा खंडित करू नका

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द ग्रामपंचायत येथील वांबोरी रस्त्यावर जवळील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील प्रांगणात उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या साहित्याची चोरीची झाली आहे. हा प्रकल्प गेल्या काही महिन्ंयापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता. तीन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीची फिर्याद ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. परंतू चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
          खडांबे खुर्द ग्रामपंचायतने सुमारे दोन वर्षांपूर्वी पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर जलजीवन योजनेच्या संलग्नित असलेला 20 सौर ऊर्जेच्या प्लेटा असलेला मोठा प्रकल्प उभारण्यात आला होता. याच सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे पारंपरिक पद्धतीने वीज निर्मिती करून या संपवेलमधील साठविलेल्या पाण्याचा उपसा करून पाणी मुख्य जलकुंभात सोडण्याची व्यवस्था केली होती, त्याकरिता लागणारी वीज निर्मिती ही याच सौर ऊर्जा प्रकल्पातून तयार होईल अशी व्यवस्था करण्यात आलेली होती. ग्रामपंचायत मालकीच्या 20 सौर ऊर्जा प्रकल्पाच्या प्लेटा पैकी दहा  प्लेटा या गेल्या तीन दिवसांपूर्वी चोरीला जाण्याची घटना घडली आहे. या चोरीला गेलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 50 हजार रुपये आहे. सदर प्रकल्पाचे कामकाज हे पूर्ण झालेले होते. वीज जोडणी व्यवस्थाही पूर्ण करण्यात आली होती. माञ प्रकल्प अद्याप पर्यंत सुरू केलेला नव्हता. प्रकल्पाचे उद्घाटन झाल्या नंतर हा प्रकल्प सुरु करण्यात येणार होता. त्यापूर्वीच सौर प्रकल्पाच्या प्लेटा चोरी जाण्याचा प्रकार घडला असल्याने  ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत खडांबे खुर्द चे ग्रामविकास अधिकारी शिवाजी लहानू ढगे यांच्या फिर्यादीवरून कलम 379 अंतर्गत अज्ञात व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलिस हे करत आहेत.

शासनाच्या योजना एक तर सहजासहजी मंजूर होत नाही मंजूर झाल्या  तर कामही अतिशय धीम्या गतीने चालते गावात कुठेतरी नवीन प्रकल्प सुरू होणार होता परंतु तो सुरू होण्या आधीच जर या प्रकल्पाच्या साहित्याची अशा प्रकारची चोरी होत असेल तर यापेक्षा दुसरी खेदाची बाब नाही.राहुरी पोलिसांनी या चोरांचा लवकरात लवकर छडा लावला. अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
दीपक हरिश्‍चंद्रे, ग्रामस्थ खडांबे खुर्द

गेल्या दोन वर्षांपूर्वी  खडांबे येथील स्मशानभूमीतील पाळणा चोरीला गेला होता त्याचाही आद्याप पर्यंत तपास लागलेला नाही.  या घटनेबाबत तरी प्रशासनाने गांभिर्याने तपास करुन  चोरीचा छडा लावावा. गणेश पारे माजी उपसरपंच खडांबे खुर्द.

COMMENTS