Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर येथे गोदामात पार्किंगला लावलेल्या टेम्पोची चोरी

लातूर प्रतिनिधी - शहरातील खाडगाव चौकानजीक रिंगरोडलगत असलेल्या अयोध्या मंडपच्या गोदाम परिसरात लावलेल्या आयशर टेम्पोची चोरी झाल्याची घटना रविवारी

भीमा नदी पात्रात बुडून चौघांचा मृत्यू
तोरणमाळ म्हणजे पर्यटनाच्या अमर्याद संधी
रमाईनगर येथे चक्रवर्ती सम्राट अशोक जन्मोत्सव उत्साहात

लातूर प्रतिनिधी – शहरातील खाडगाव चौकानजीक रिंगरोडलगत असलेल्या अयोध्या मंडपच्या गोदाम परिसरात लावलेल्या आयशर टेम्पोची चोरी झाल्याची घटना रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली आहे. सीसीटीव्हीचे फुटेजही ताब्यात घेतले आहेत.
लातूर शहरातील पाच नंबर चौकातून खाडगाव चौक रिंग रोड मार्गावर एका मंगल कार्यालयासमोर मंडप, सजावटीचे काम करणार्‍या अयोध्या मंडपचे गोदाम आहे. या ठिकाणी आयशर टेम्पो क्रमांक (एमएच 04, एफपी 1172) शनिवारी सायंकाळी पार्किंगमध्ये लावण्यात आला होता. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास टेम्पो गायब असल्याचे आढळून आले. जवळपास दोन तास विविध ठिकाणी पाहणी, विचारपूस केली. तरीही टेम्पो सापडला नाही. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून फिर्यादी सोहेल जमाल पठाण यांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांच्या सूचनेवरून दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्यातील डीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS