अहमदनगर प्रतिनिधी- डोक्याला पिस्तुल लावत संगमनेर शहरातील सह्याद्री हायस्कूल शेजारी असलेल्या शोभना केदारनाथ भंडारी यांच्या घरात जबरी चोरी झ

अहमदनगर प्रतिनिधी- डोक्याला पिस्तुल लावत संगमनेर शहरातील सह्याद्री हायस्कूल शेजारी असलेल्या शोभना केदारनाथ भंडारी यांच्या घरात जबरी चोरी झाली आहे. या चोरीत अज्ञात चोरट्यांनी 4 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. यामध्ये 2 लाख 60 हजार रुपयांची रोख रक्कम आणि तब्बल साडेनऊ तोळे सोनं चोरून नेले आहे. चोरट्याने या घरात प्रवेश करत शोभना भंडारी यांचा मुलगा पार्थ आणि त्याचा मित्र प्रणव यांना मारहाण करत, चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरून नेले. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे, मागील दोनच दिवसांपूर्वी चोरट्याने गोल्डन सिटी मध्ये दोन बंगले फोडून रोख रक्कम चोरून गेली होती, शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असून आता या चोरट्यांचा तपास लावण्याचा मोठ आव्हान संगमनेर पोलिसांपुढे उभे राहील आहे. या घटनेचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करत आहे.
COMMENTS