Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी शहरातील खंडोबा मंदिरात चोरी

पाथर्डी प्रतिनिधी - शहारातील बाजारतळावरील जागृत देवस्थान श्री.खंडोबा मंदिराचे कुलुप तोडून पूजा साहित्य,त्रिशूल,पुरातन मूर्ती चोरट्यांनी लंपास के

ऐफाज व तैमुर ने धरले रमजानचा उपवास
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यरत
मोनिकाताई राजळे आमची बहिण – प्रतापकाका ढाकणे

पाथर्डी प्रतिनिधी – शहारातील बाजारतळावरील जागृत देवस्थान श्री.खंडोबा मंदिराचे कुलुप तोडून पूजा साहित्य,त्रिशूल,पुरातन मूर्ती चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असुन घटना गुरुवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.


याबाबतची प्राथमिक समजलेली माहिती अशी की, श्री खंडोबा देवस्थानचे पुजारी उमेश सुपेकर हे गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास नित्यपुजा आरती करण्यासाठी मंदिरात आले. त्यावेळी त्यांना खंडोबा मंदिराचे दरवाजे उघडे असल्याचे तसेच  दरवाजाचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पाथर्डी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. यावेळी तात्काळ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सर्व प्रकार पाहता त्यांनी ठसे तज्ञ व श्‍वान पथकाला पाचारण केले.सायंकाळी उशिरा पथक घटनास्थळी दाखल झाले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले श्री.खंडोबा मंदिर हे शहरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून या प्रकरणाचा तपास करुन चोरट्यांना अटक व्हावी अशी मागणी होत आहे.

COMMENTS