अकोले/प्रतिनिधीः अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले जायनावाडी हे गाव तस अति दुर्गम भागात वसलेले गाव आहे. त्यामुळे तेथील लोकांचा व्यवसाय

अकोले/प्रतिनिधीः अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले जायनावाडी हे गाव तस अति दुर्गम भागात वसलेले गाव आहे. त्यामुळे तेथील लोकांचा व्यवसाय शेती हा आहे. येथील शेतकरी दिवसरात्र मेहनत करुन वादळवार्याची पर्वा न करता शेती करतात. परंतु गारपीट, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांचा हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे येथील शेतकर्यांना आर्थिक फटका बसतो. त्यासाठी ई-पिक पहाणी लावणे येथील शेतकर्यांना अत्यंत गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भांगरे, सागर डगळे, सुभाष भांगरे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष हरिदास भांगरे,किसन भांगरे, यांनी गावातील शेतकर्यांना ई-पीक पहाणी लावण्यासाठी शेतकर्यांना आवाहन केले आहे.
दर वर्षाप्रमाणे यंदाही नैसर्गिक आपत्तीमुळे भारतातील शेतकर्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. चक्रीवादळे,गारपीट,अतिवृष्टी आदि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची अपरिमित हानी होते. त्यासाठी सर्व शेतकर्यांना सरकारने 13 जानेवारी 2016 रोजी एक योजनेचा शुभारंभ केला. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकाने प्रधानमंत्री पीकविमा योजना ( पीएमएफबीवाय ) सुरु केली. ज्या शेतकर्यांकडे मोबाईल नाही.अश्या शेतकर्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पहाणी लाऊन दिली. सर्वांनी 15 सप्टेंबर पर्यंत ई-पीक करून घेतली पाहिजे. असे आवाहन किसन भांगरे यांनी गावातील सर्व शेतकर्यांना मार्गदर्शन करताना केले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
COMMENTS