अहमदनगर ः बालरंगभूमी परिषद अहमदनगर जिल्हा शाखा आयोजित ’हसत खेळत बालनाट्य शिबीर’ 20 ते 5 मे 2024 पर्यंत माऊली सभागृह अहमदनगर येथे पार पाडले. त्याच

अहमदनगर ः बालरंगभूमी परिषद अहमदनगर जिल्हा शाखा आयोजित ’हसत खेळत बालनाट्य शिबीर’ 20 ते 5 मे 2024 पर्यंत माऊली सभागृह अहमदनगर येथे पार पाडले. त्याचा समारोप कार्यक्रम 5 मे 2024 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्ष सिनेनाट्य अभिनेत्री निलम शिर्के-सामंत, उपाध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, अभिनेते मोहिनीराज गटणे, अमित बैचे, पुणे जिल्हाध्यक्ष दिपाली शेळके, नंदकुमार जुवेकर, अरूण पटवर्धन, अनंत जोशी उपस्थित होते.
या वर्षी शिबिरात 109 बाल कलाकार सहभागी झाले होते. त्यांना प्रा.डॉ. सय्यद अमजत, सतीश लोटके, शैलेश देशमुख, देवीप्रसाद सोहोनी, सागर अलचेट्टी यांनी प्रशिक्षण दिले. सहभागी कलाकारांनी सादर केलेल्या नाट्य छटा, एकांकिका, नृत्य, सूत्रसंचालनाने उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी सिने-नाट्य अभिनेत्री, बालरंगभूमी परिषद मुंबईच्या अध्यक्षा निलम शिर्के- सामंत यांनी बालरंगभूमी परिषदेच्या अंतर्गत भविष्यात राबविण्यात येणार्या अनेक नवीन उपक्रमांची माहिती दिली. ज्यामध्ये बालनाट्य स्पर्धा किंवा बालरंगभूमीवर तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी बाल कलावंतांना सक्षम करण्याच्या हेतूने अभिनयासोबतच बाल कलावंतांना रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, दिग्दर्शन याचेही प्रशिक्षण देण्यात येईल तसेच बालरंगभूमी परिषद केवळ नाट्यकलेपुरतीच मर्यादित न राहता इतर ललित कला प्रकारांचा समावेश त्यामध्ये व्हावा, या हेतूने भविष्यात बालरंगभूमी परिषदेचे कार्य राहील असेही त्या म्हणाल्या. बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या उपाध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांनी सर्व कार्यकारिणी सदस्यांचे शिबीर आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करत आपले मनोगत व्यक्त केले. मुंबईचे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके यांनी भविष्यात विविध पारितोषिक विजेत्या तसेच उत्कृष्ट अशा बालनाट्य संहिता एकत्रित करून त्या निशुल्क सर्वांना उपलब्ध कशा करून देता येतील या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, तसेच बालरंगभूमीसाठी सातत्याने बालनाट्य चळवळ राबविणार्या किंवा बालरंगभूमीवर कार्यरत असणार्या होतकरू कलावंतांचा, जेष्ठाचा सन्मान बालरंगभूमी परिषदेतर्फे करण्याची योजना असल्याचे सांगितले. समारोप प्रसंगी सिनेनाट्य अभिनेते मोहिनीराज गटणे, सिने नाट्य लेखक दिग्दर्शक अमित बैचे, कार्यकारी मंडळ सदस्य अनंत जोशी, नगर बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सौ.उर्मिला लोटके यांच्यासह नगरकर नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शिबीराचा समारोप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिबीर प्रमुख तेजा पाठक, सोनाली दरेकर, विराज अडगटला, प्रमुख कार्यवाह प्रसाद भणगे, कार्याध्यक्ष देवीप्रसाद सोहनी, उपाध्यक्ष शैलेश देशमुख, सुजाता पायमोडे, कोषाध्यक्ष टिना इंगळे, श्रेया देशमुख, सपना साळुंके, सागर अलचेट्टी, तेजस अतितकर, भाग्यश्री दातखिळे, प्रशांत सूर्यवंशी, ऋतुजा पाठक, अविनाश बोधले, मैथिली जोशी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तेजा पाठक यांनी केले तर आभार प्रमुख कार्यवाह प्रसाद भणगे यांनी मानले.
COMMENTS