Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कोपरगावच्या ऑल इन वन सर्व्हिसेसचे काम कौतुकास्पद ः आगवण

कोपरगाव प्रतिनिधीः कोपरगाव शहरातील ऑल इन वन सर्व्हिसेसचे कार्य कौतुकास्पद आहे.असे उदगार कोपरगाव शहरात सुरू असलेल्या ऑल इन वन सर्व्हिसेसच्या दुसर

राहुरी फॅक्टरीजवळील अपघातात पती-पत्नीचा मृत्यू
संजीवनीच्या विद्यार्थ्यांची लायन्स मूकबधिर विद्यालयास भेट
थकबाकीदार विनायक बोगा यांनी खोटा चेक दिल्याने कारावासाची शिक्षा

कोपरगाव प्रतिनिधीः कोपरगाव शहरातील ऑल इन वन सर्व्हिसेसचे कार्य कौतुकास्पद आहे.असे उदगार कोपरगाव शहरात सुरू असलेल्या ऑल इन वन सर्व्हिसेसच्या दुसर्‍या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी करंजी गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र आगवण यांनी व्यक्त केले.
कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील रहिवाशी असलेल्या तनु पठाण यांनी बी.कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण करत बँकिंग क्षेत्रातील विशेष अभ्यासक्रम पूर्ण करून पुणे येथील ऍक्सिस बँकेत पाच वर्षे रिलेशनशिप व्यवस्थापक या पदावर नोकरी केली. गेल्या दोन वर्षांपूर्वी स्वप्नांना पंख भेटतात या म्हणी नुसार कोपरगाव शहरात सुरू केलेल्या ऑल इन वन सर्व्हिसेसद्वारे ग्राहकांना वेगवेगळ्या बँकेचे गृहकर्ज, व्यवसाय कर्ज, वैयक्तिक कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, कॅश क्रेडिट आणि ओवर ड्राफ्ट, प्रकल्प मुद्रा लोन कर्ज, उपकरण कर्ज, सोनेतारण कर्ज, शेतीपुरक व्यवसाय कर्ज, शेतीपिक कर्ज आदी कर्ज मिळविण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जाते. याला ग्राहकांचा देखील भरपूर प्रतिसाद मिळत असून, त्याच अनुषंगाने ग्राहकांच्या सेवेकरिता दुसरी शाखा सुरू केली आहे. याप्रसंगी नाथभक्त शैलेश माळी, ऑल इन वन सर्व्हिसेसचे मार्गदर्शक सचिन फोफसे, करंजीचे उपसरपंच शिवाजी जाधव, तनु पठाण यांचे वडील मदेखा पठाण, शिवाजी आगवन, वैजापूर येथील रजपूत, गोंडेगावचे भाऊसाहेब फोपसे, करंजी येथील ऍग्रो लक्ष्मी बँकेचे चेअरमन राजू शेख, सुनील जाधव यांच्यासह ऑल इन वन सर्व्हिसेस सोबत करत असलेल्या अहमदनगर, वैजापूर, कोपरगाव, श्रीरामपूर, येवला आदी शहरातील विविध बँकांचे अधिकारी व कर्मचारी, ऑल इन वन सर्व्हिसेस वैजापूर शाखेचे व्यवस्थापक प्रीतम आहेर यांच्यासह  ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे ऑल इन वन सर्व्हिसेसच्या सर्वेसर्वा तनु पठाण व त्यांच्या कुटुंबियांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

COMMENTS