बेलापूर प्रतिनिधी - बेलापुर बस स्थानकाची भिंत अज्ञात इसमाने तोडली असुन संबधीतावर कारवाई करण्याची मागणी बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने एस टी मह

बेलापूर प्रतिनिधी – बेलापुर बस स्थानकाची भिंत अज्ञात इसमाने तोडली असुन संबधीतावर कारवाई करण्याची मागणी बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने एस टी महामंडळाकडे करण्यात आली असुन महामंडळाच्या अधीकाऱ्यांनी देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेवुन घटनास्थळी भेट देवुन गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कायम गजबजलेले असलेल्या बेलापुर बस स्थानकाची मागील बाजुस भिंतीस बसवीलेली खिडकी काही दिवसापूर्वी कुणीतरी तोडली होती. त्यावर काहीच कारवाई न झाल्यावर काल रात्री कुणीतरी खोडसाळपणे भिंतीलाच मोठे भगदाड पाडले आहे. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या कानावर ही बाब घातली. पत्रकार देविदास देसाई यांनी तातडीने आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांच्या कानावर ही बाब घातली. श्रीरामपूर बस स्थानकाचे आगार प्रमुख राकेश शिवदे हे तातडीने बेलापूर येथे आले त्यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा यांच्या समवेत संबधीत ठिकाणी भेट दिली. त्यावेळी अज्ञात इसमाने ही भिंत तोडली असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी बस स्थानकाचे कार्यालय कित्येक दिवसापासून बंद असल्याचे पत्रकार देसाई यांनी निदर्शनास आणून दिले असता लगेच या ठिकाणी कर्मचारी नियुक्त केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच तोडलेली भिंत तातडीने पुन्हा पूर्ववत केली जाईल या करीता ग्रामपंचायतीने सहकार्य करावे असे आवाहनही शिवदे यांनी केले. या वेळी स्थानक प्रमुख वसंत लटपटे प्रवासी मित्र प्रतिक बोरावके सुरक्षा रक्षक प्रकाश मुठे प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड विलास कुर्हे आदि उपस्थित होते.
COMMENTS