बीड प्रतिनिधी - बीडच्या विडा गावातील निजाम काळात सुरू झालेली परंपरा आज तागायत कायम आहे. धुलीवंदनाच्या दिवशी गावात जावयाची गाढवावरून मिरवणूक

बीड प्रतिनिधी – बीडच्या विडा गावातील निजाम काळात सुरू झालेली परंपरा आज तागायत कायम आहे. धुलीवंदनाच्या दिवशी गावात जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. या अनोख्या परंपरेचे जतन आजही ग्रामस्थांनी केले आहे. केज तालुक्यातील विडा येथे धुलीवंदनाला जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. गेल्या 90 वर्षापासून ही परंपरा सुरूच आहे. जावई म्हटलं की सासरकडील मंडळी इतर वेळी आपल्या जावयाच्या पुढे पुढे करताना पाहायला मिळतात. मात्र विड्यात ही आगळी वेगळी परंपरा आहे. यासाठी ग्रामस्थांना दरवर्षी जावयाचा शोध घेण्यासाठी दमछाक होते. यावर्षी अविनाश करपे यांना हा मान मिळाला आहे. रात्री दीड वाजता त्यांना ग्रामस्थांनी शोधून गावात आणले आहे. तर आज त्यांची ही मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली. मिरवणूक झाल्यानंतर गावातील हनुमान मंदिराच्या पारावर ग्रामस्थांकडून या जावयाला आहेर देण्यात आला.
COMMENTS