कोपरगाव तालुका ः कोपरगाव कृषि उत्प़न्ऩ बाजार समितीमध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 350 कोटीचेवर आर्थिक उलाढाल झाली असून बाजार समितीला 311 कोटीचे उ

कोपरगाव तालुका ः कोपरगाव कृषि उत्प़न्ऩ बाजार समितीमध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 350 कोटीचेवर आर्थिक उलाढाल झाली असून बाजार समितीला 311 कोटीचे उत्प़न्ऩ झालेले ऊुन बाजार समितीच्या आजवरच्या वाटचालीत विक्रमी उत्प़न्न व नफा झाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती साहेबराव किसनराव पा. रोहोम यांनी दिली आहे.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे, विवेक कोल्हे तसेच राजेश परजणे व नितीन औताडे यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली सहमतीने तसेच सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे यांचे अधिपत्याखाली संचालक कार्यरत असून ते शेतकरी हित लक्षात घेऊन शेतकरी बांधवांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सदैव तत्पऱ आहेत. बाजार समितीच्या मुख्य मार्केट मध्ये व उपबाजार आवार तिळवणी येथे शेतकर्यांचे शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी बांधव इतरत्र न जाता येथेच आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. शेतकर्यांचे हित लक्षात घेता संचालक मंडळाने बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनीक प्रणालीचा वापर करुन बाजार समितीच्या आवारात शेतमाल विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाची लिलावापूर्वी ऑनलाईन नोंद होवून लिलाव झाल्यावर वजन होताच शेतकर्याला शेतकरी, मापाडी, खरेदीदार यांचे नावासह व्यवहाराची संपुर्ण माहिती व्हाट्सप वर मिळत आहे. यामुळे कोपरगांव बाजार समितीचा करभार हायटेक व पारदर्शी झालेला आहे. ही एक रियट टाईम डिजीटल ऑक्शऩ रिपोर्टींग सिस्टीम आहे. यामुळे शेतक-यांना घरबसल्या आपल्या मोबाईलवर शेतमालाला मिळालेला भाव समजतो. या बंतोष प्रणालीच्या माध्यमातुन पावत्या बनवणे आणी त्याचे रेकॉर्ड आनलाईन ठेवणे सोपे जाते. तसेच वेळ, पैसा, मनुष्यबळ आदीची बचत होत असल्याने हि प्रणाली फायदेशीर आहे. यामुळे बाजार समितीचे व्यवहार डिजीटल झालेले आहे अशी माहीतीही सभापती साहेबराव रोहोम यांनी प्रसिद्धी पञकाद्वारे दिली.बाजार समितीने शेतकर्यांसाठी खालील सुविधा उपलब्ध़ करुन दिलेल्या आहेत. यामध्ये उपबाजार आवार तिळवणी येथे तसेच कोपरगांव येथील भाजीपाला आवार व जनावरे बाजार याठिकाणी टॉयलेट ब्लॉकचे बांधकाम चालु आहे. जनावरे बाजारात जनावरांना पाणी पिण्यासाठी आहाळ बांधण्यात आलेले आहे तसेच शेतकरी व व्यापारी यांना जनावरे बाजारात जार चे थंडगार पाणी पिण्यासाठी उपलब्ध़ करुन देण्यात आलेले आहे. तसेच बाजार समितीने शेतक-यांच्या सोयीसाठी भाजीपाला मार्केट येथे कोल्ड स्टोअरेजची उभारणी केली आहे. यापुढे बाजार समिती विविध विकास कामे करणार असुन उत्प़न्ऩ वाढीसाठी नविन उपक्रम राबविणार असुन शेतक-यांच्या शेतमालाच्या विक्रीमध्ये पारदर्शकता असल्यामुळे त्यातुन शेतक-यांचा निश्चित फायदा होईल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त़ केला आहे. बाहेरील राज्यातील व स्थानिक व्यापारी यांचे स्प़र्धेतुन शेतक-यांच्या शेतमालाला वाजवी किंमत मिळते तसेच चोख वजनमाप, काटला नाही, रोख पेमेंट यामुळे बाजार समितीवर शेतक-यांचा विश्वास असल्यामुळे बाजार समितीमध्ये आवक मोठया प्रमाणात होत आहे. शेतक-यांनी आपला शेतमाल कोपरगांव बाजार समिती व उपबाजार आवार तिळवणी येथे विक्रीस आणुन आपला फायदा करुन घ्यावा असे आवाहन सचिव एन.एस.रणशूर यांनी सांगीतले आहे
COMMENTS