Homeताज्या बातम्यासंपादकीय

तामिळनाडू प्रपोगंडामागचे खलत्त्व ! 

तामिळनाडूत दोन बिहारी कामगारांवर हिंदी भाषिक असल्याने हल्ला झाल्याचे सांगत त्याविषयी रक्तात पडलेल्या तरूणांचा फोटो आणि बातमी सुरूवातीला समाज माध्

घटनात्मक वर्चस्व कुणाचे !
नेते तीन; संदेश एक !
कर्पुरी ठाकूर यांच्या भारतरत्न निमित्ताने !

तामिळनाडूत दोन बिहारी कामगारांवर हिंदी भाषिक असल्याने हल्ला झाल्याचे सांगत त्याविषयी रक्तात पडलेल्या तरूणांचा फोटो आणि बातमी सुरूवातीला समाज माध्यमात आणि नंतर उत्तर भारतातील एका मोठ्या दैनिकात छापून आली. त्यानंतर भाजपने तामिळनाडूतील बिहारी कामगारांवर होत असलेल्या कथित सल्ल्यावरून नितीशकुमार सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात तामिळनाडू सरकारला जाब विचारला पाहिजे, ही भूमिका भाजप आणि भाजप सोबत करणाऱ्या जन अधिकार आंदोलनाचे पप्पू यादव यांनी घेतली. इथ पर्यंतचा घटनाक्रम आपणा सर्वांना ज्ञात आहेच. परंतु, हा विषय छेडण्याचं कारण असं की, भाजपने उचलेला हा प्रश्न पूर्णपणे कपोलकल्पित असल्याचे आता सिध्द झाले आहे. भाजपने जेव्हा हा विषय हातात घेतला तेंव्हाच बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी ठामपणे म्हटले होते की, ही घटनाच फेक आहे. आता ते सिद्ध झाले आहे. या प्रपोगंडा ठरलेल्या घटनाक्रमाची सुरूवात २० फेब्रुवारी २०२३ ला झाली. अखिलेश कुमार नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवर या प्रपोगंडानुसार एक फोटो आणि सोबत बातमी होती. या फोटोत दोन तरूणांवर तिरूपूर येथे हल्ला झाल्याचे आणि ते रक्तात पडलेले दिसले. त्यासोबत मजकूर होता की, या दोन बिहारी तरूण कामगारांवर हिंदी भाषिक असल्यामुळे हल्ला झाल्याचे त्या कथित बातमीत म्हटले होते. यानंतर पप्पू यादव यांच्या फेसबुकवर ही बातमी झळकली; परंतु, त्यापूर्वीच हिंदी भाषेतील एका मोठ्या दैनिकात हीच बातमी छापून आली. वास्तविक, हे फोटो जे वापरले गेले ते १२ फेब्रुवारी २०२३ ला कोइंबतूर येथे घडलेल्या घटनेचे होते.  त्या घटनेत रक्तात पडलेले तरूण मुळ तामिळनाडूचे गोकुळ आणि मनोज नावाच्या तरूणांचे होते.

यावरून हे स्पष्ट होते की,  हा प्रपोगंडा होता; आणि तेजस्वी यादव यांच्या म्हणण्यानुसार ही फेक बातमी आहे, ती सिद्ध झाली. मात्र, याठिकाणी प्रश्न उपस्थित होतो की, संघप्रणित पत्रकारांनी असं का करावं? तर, याचे कारण म्हणजे तामिळनाडू चे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा १ मार्च रोजी वाढदिवस होता. त्या वाढदिवसाला बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव जाणार असल्याचे जाहीर होताच या प्रपोगंडाची कथित रचना करण्यात आली. कारण या दोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीमुळे तामिळनाडू चे प्रभावी ब्राह्मणेतर सत्ताकारण उत्तर भारतात पोहचले तर आख्खा उत्तर भारतच संघ-भाजपच्या प्रभावातून बाहेर पडेल, ही भिती संघ-भाजपला अस्वस्थ करणारी आहे. बिहार चे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे संघ-भाजपचे कट्टर विरोधक. लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वातील रथयात्रा अडवली होती. वास्तविक त्यावेळी ही संधी उत्तर प्रदेश चे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनाही होती. परंतु, त्यांनी ती संधी घेतली नाही. याचे कारण मुलायमसिंह समाजवादी असले तरी आतल्या राजकारणात त्यांची धरसोड सुरू राहत असे. परंतु, लालूप्रसाद यादव हे संघ-भाजपचे कट्टर विरोधक. हीच पार्श्वभूमी तेजस्वी यादव यांची स्टॅलिन यांच्यासोबत भेट झाल्यावर आणखी प्रखर होईल, ही भीती संघाला अस्वस्थ करणारी ठरेल, म्हणून ती भेट होवू नये, यासाठीच या प्रपोगंडाची कथित रचना करण्यात आली. एकमात्र खरे की, ब्राह्मणेतर राजकारणाची ही महत्वपूर्ण भेट रोखता आली नाही; याचा अर्थ संघाच्या मनात असणारी भीती आता प्रत्यक्षात वास्तवात येण्यापासून टाळता येऊ शकत नाही, हेच खरे!

COMMENTS