Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मविआला लाडक्या बहिणींचा त्रास

फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार हल्ला

अकोला ः लाडकी बहीण योजनेमुळे आपण पुढे जात आहोत, मात्र या योजनेमुळे अनेकांच्या पोटात दुखायला सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीला या योजनेचा सर्वाधि

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींच्या मागण्यांसाठी आंदोलन
स्कूल  व्हॅन उलटून सहा विद्यार्थी जखमी
नांदेडमधील अपघातात 5 जणांचा मृत्यू

अकोला ः लाडकी बहीण योजनेमुळे आपण पुढे जात आहोत, मात्र या योजनेमुळे अनेकांच्या पोटात दुखायला सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीला या योजनेचा सर्वाधिक त्रास होत आहे. ते रोज या योजनेवर बोलत होते. या योजनेच्या विरोधात ते कोर्टात गेले. योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेले. मात्र हायकोर्टात त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर योजनेसाठी सरकारकडे पैसे नसल्याचा आरोप त्यांनी केला, त्यामुळे खर्‍या अर्थाने महाविकास आघाडीला लाडक्या बहिणींचा त्रास होत असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आपला सामना महाविकास आघाडीच्या तीनच पक्षासोबत नाही तर चौथ्या म्हणजे खोट बोलणार्‍या सोबत झाला असेही ते म्हणाले आहेत.  आता विरोधकांकडून 1500 रुपयांनी काय होते? असा सवाल होतो. मात्र ते तरी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले तरी त्या 1500 रुपयांचे महत्त्व काय आहे हे गृहिणीला विचारा. महिन्याच्या शेवटी याच 1500 रुपयांचे महत्त्व असते. मात्र जे लोक हॉटेलमध्ये जाऊन 1500 रुपयांची टीप देतात, त्यांना या रक्कमेचे महत्त्व कधीच समजू शकत नाही. त्यामुळे बहिणींची थट्टा करणे सुरू आहे. मात्र हे सावत्र भाऊ असल्याचे बहिणींच्याही लक्षात आले आहे’’, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. लोकसभेत खोटा प्रचार त्यांनी केला. एक खोटा नेरेटीव्ह मुस्लिम समाजात देखील पसरवण्यात आला होता. लोकसभेत आपल्या जागा कमी आल्या. मात्र आपले मताधिक्य कमी झालेले नाही. त्यांच्यापेक्षा फक्त 2 लाख मते आपल्याला कमी मिळाले. भाजपच्या 12 जागा केवळ 3 टक्के मतांनी पडल्या. धुळे हे त्याचे उदाहरण आहे. अतिशय कमी मतांनी धुळ्यात पराभव झाला. मात्र जे खोटे असते त्याचे वय छोटे असते, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीसांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची चूक – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची चूक समोर आली.फडणवीस यांचा ताफा मुख्य राष्ट्रीय महामार्गावर लागला तरी फडणवीसांच्या सुरक्षा यंत्रणेतील पोलिसांचा ताफा हा कृषी विद्यापीठातच होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेची ही मोठी चूक समोर आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या विश्रामगृहातफडणवीस जाणार असे सुरक्षा यंत्रणेला वाटले होते. मात्र फडणवीस यांचे वाहन थेट मुख्य महामार्गावर लागल्याने त्यांच्या ताफ्यातील मागील सुरक्षा यंत्रणेचा ताफा हा मागेच राहिला. यात पोलिसांचे वाहन आणि अ‍ॅम्बुलन्स इतर वाहने मागेच राहिले होते.

COMMENTS