Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हार्बर लाईनवरील रेल्वे पुन्हा रूळावरून घसरली

मुंबई ः मुंबईतील हार्बर लाईन रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगत बुधवारी पुन्हा एकदा लोकल रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे.

शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा परीक्षा कामांवर बहिष्कार
प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव अंतर्गत गावोगाव लसीकरण मोहीम
उपसभापतींच्या निर्णयाविरोधात शिंदे गट जाणार न्यायालयात

मुंबई ः मुंबईतील हार्बर लाईन रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगत बुधवारी पुन्हा एकदा लोकल रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 2 वर ही घटना घडली. यावेळी लोकलचे इंजिनच रुळावरून घसरले. यामुळे या मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी 29 एप्रिल रोजी लोकलचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या 2 दिवसांतच पुन्हा ही घटना घडली आहे.

COMMENTS