Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोणीच्या तंत्रनिकेतनची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

सुशांत गाडे 93.21 टक्के गुण मिळवून सुवर्णपदकाचा ठरला मानकरी

लोणी ः राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून लोणी येथील पदमश्री विखे पाटील पॉलिटेक्निकने दरवर्षीप्

दुष्काळमुक्तीसाठी पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळवणार ः मुख्यमंत्री शिंदे
Ahmednagar : मनसेच्या वतीने शासकीय परिपत्रकाची होळी l Lok News24
’शुक्र तीर्थ’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात

लोणी ः राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून लोणी येथील पदमश्री विखे पाटील पॉलिटेक्निकने दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली असून सिव्हील विभागातील सुशांत गाडे याने 93.21 टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावीला असून श्रीमती सिंधूताई विखे पाटील सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. तसेच मेकॅट्रॉनिक्स विभागातील कृष्णा बाळासाहेब थोरात 91.48 टक्के गुणांनी द्वितीय आणि कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या विभागातील कु अक्षता संपत कडू हिने 90.63 टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांक मिळविला असल्याची माहिती प्राचार्य प्रा. डॉ.विजयकुमार राठी यांनी दिली.
        विभागवार प्रथम क्रमांकाचे मानकरी कॉम्प्युटर विभाग कु. अक्षता संपत कडू हिने 90.63 टक्के, केमिकल-अथर्व गायकवाड 89.83 टक्के, सिव्हिल-सुशांत गाडे 93.21 टक्के, मेकॅनिकल- प्रनव वर्पे 84.56  टक्के, ऑटोमोबाइल-निशांत गाडे 78.43 टक्के, क्लाऊड कॉम्प्युटींग अँण्ड बिग डेटा-पार्थ कुलकर्णी 86.96 प्रथम, मेकॅट्रॉनिक्स विभागात कृष्णा बाळासाहेब थोरात याने 85 टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे. बहुतांश विभागांचा निकाल 100 टक्के असून इतर विभागांचा 95 टक्केच्यावर निकाल लागलेले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. विजय राठी, उपप्राचार्य प्रा. नामदेव गरड, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

COMMENTS