अहमदनगर : दुकानाच्या पाठीमागील पत्र्याच्या दरवाज्याची कडी तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला आतील सामानाची उचकापाचक करुन गल्ल्यातील व
अहमदनगर : दुकानाच्या पाठीमागील पत्र्याच्या दरवाज्याची कडी तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला आतील सामानाची उचकापाचक करुन गल्ल्यातील वीस हजार रुपयाची रोकड चोरून नेली. ही घटना भुषणनगर लिंक रोड, रंगोली हॉटेलचे पाठीमागे केडगाव येथे घडली. या बाबतची माहिती अशी की रविंद्र सुधाकर कोतकर (वय ३० वर्षे,रा.कोतकर मळा केडगाव) यांचे सगुना अँड गावरान,चिकन सेंटर,या नावाने भुषणनगर लिंक रोड, रंगोली हॉटेलचे पाठीमागे केडगाव अहमदनगर येथे चिकन शॉप आहे. दुकानात काम करणारे अमिर शेख व जमीर शेख यांनी दुकान व्यवस्थीत कुलुप लावुन बंद केले. मध्यरात्री दुकानाचे पाठीमागील पत्र्याच्या दरवाजाची कडी तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या गल्ल्यातील २० हजार रुपये चोरुन नेले. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी रविंद्र कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली.
COMMENTS