Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्धापुरात तहसीलदार यांच्या गाडीला ट्रॅक्टरची धडक तीन जण जखमी

अर्धापूर । प्रतिनिधीतहसीलदार रेणुकादास देवणीकर हे नांदेडहून तहसील कार्यालय अर्धापूर कडे येत असताना शहरातील वनविभागाच्या कार्यालयासमोर नांदेडकडे जा

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात दाम्पत्यासह नदीत कोसळली कार.
एक्सेल तुटल्याने एसटी बस पलटी
समृद्धीवरील अपघातात दोन डॉक्टरासह 3 जणांचा मृत्यू

अर्धापूर । प्रतिनिधी
तहसीलदार रेणुकादास देवणीकर हे नांदेडहून तहसील कार्यालय अर्धापूर कडे येत असताना शहरातील वनविभागाच्या कार्यालयासमोर नांदेडकडे जाणार्‍या ट्रॅक्टरने अचानक तहसीलदार यांच्या गाडी समोर आल्याने ट्रॅक्टर व गाडीची जोरदार धडक झाली. तहसीलदार यांच्या गाडीच्या एअरबॅक खुलल्याने गाडीत प्रवास करणारे तहसीलदार रेणुकादास देवणीकर, चालक अरुण वाघमारे,सेवक शेख सलीम हे बाल बाल बचावले असून हा अपघात एवढा जबरदस्त होता की नांदेड कडे जाणारे ट्रॅक्टर अचानकपणे हिंगोली रस्त्यावर आल्याने हा अपघात झाला आहे.
या अपघातातील जखमींवर प्राथमिक उपचार ग्राम रुग्णालय अर्धापूर येथे करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

COMMENTS