Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसील इमारतीने गाठला अस्वच्छतेचा कळस

अधिकार्‍यांचे दुर्लक्ष तर नागरिकांचा बेशिस्तपणा

कोपरगाव प्रतिनिधी ः महात्मा गांधीचा स्वच्छतेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियानाची’ घोषणा केली. आणि या घोष

दारणा पाणलोटातील पावसाने गोदावरी खोर्‍यात समाधान
पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला
मनपा करणार एका प्रभागात मीटरद्वारे पाणीपुरवठा ; यंदाचे अंदाजपत्रक 802 कोटींचे, नवी करवाढ नाही

कोपरगाव प्रतिनिधी ः महात्मा गांधीचा स्वच्छतेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियानाची’ घोषणा केली. आणि या घोषणेची अनेक सामाजिक संस्थेसह शासकीय अधिकार्‍यानी देखील काटेकोरपणे अंमलबजावणी केली. मात्र कोणत्याही शासकीय अथवा सार्वजनिक ठिकाणी गेल्यास त्या बालपणी मिळालेल्या स्वच्छतेच्या शिकवणीचा धंदा  आपण पूर्णतः पायदळी तुडवल्याचा नुकताच अनुभव कोपरगाव तहसील कार्यालयाच्या भव्य दिव्य अशा इमारतीत आला आहे.
कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य दिव्य अशी तहसील कार्यालयाची प्रशासकीय इमारत असून या इमारतीत तहसील कार्यालय आहे तर दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावर कृषी, सामाजिक वनीकरण, वनविभाग, ट्रेझरी असे अनेक सामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची कार्यालय असून नेहमीच मोठी वर्दळ या कार्यालय असते. परंतु या कार्यालयाच्या  अधिकार्‍यांच्या बाहेर तसेच येण्या जाण्याच्या जिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ, रिकाम्या बाटल्या, व कचर्‍याचे साम्राज्याचे साठलेले आहे तर जिन्यांमध्ये अनेक ठिकाणी पायर्‍यावर काही असभ्य नागरिकांनी गुटखा पान खाऊन पिचकार्‍या मारत भिंती लाल केलेल्या दिसून येत आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वी देशभरात राबविल्या गेलेल्या एका मोठ्या स्वच्छता मोहीमेत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी जमिनीवर येत प्रत्यक्षात सर्वजिनिक ठिकाणी स्वच्छता केली. कोपरगावात देखील अनेक ठिकाणी ही मोहीम मोठ्या जल्लोषात शासकीय अधिकार्‍यांसह अनेक शाळा कॉलेजेस सामाजिक संघटना यांच्या सहभागाने राबविण्यात आली. परंतु  या तहसील इमारतीतील दुसरा व तिसरा मजला पाहता या मजल्यावरील संपूर्ण विभागाच्या अधिकार्‍यांचे या अस्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून आले आहे. तर या इमारतीत अनेक ठिकाणी असलेली शौचालये व मुतार्‍या या देखील अत्यंत अस्वच्छ असून त्यातून येणार्‍या उग्रवासाने अनेक नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाला तहसील कार्यालयात असलेल्या अनेक विभागाच्या अधिकार्‍यांनी केराची टोपली दाखवली की काय? हाच प्रश्‍न या परिस्थितीवरून दिसून येत आहे.

नागरिकांनी समाजभान ठेवणे गरजेचे – सर्वजिनिक इमारतीमध्ये आपल्या मधीलच मूठभर असभ्य अस्वच्छ घाण करणार्‍या नागरिकांनी देखील मनाचे काही भान ठेवत सार्वजनिक ठिकाणी अशी घाण करणे टाळावे, कारण आपण केलेली घाण स्वच्छ करणारा हा देखील एक माणूसच आहे हे लक्षात ठेवावे.

कॅमेरे बसवून दंडात्मक कारवाईची गरज – शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी कचरा, घाण करणे, लघुशंका करणे अथवा थुंकणे हा अक्षम्य गुन्हा मानला जात असून तो करणार्‍यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येते. त्यामुळे या कार्यालयात अशा ठिकाणी कॅमेरे बसून सदर गुन्हा करणार्‍या वर मोठी दंडात्मक कारवाई करावी.

COMMENTS