विधानसभेतील 12 आमदारांच्या निलंबनांला स्थगिती नाहीच

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभेतील 12 आमदारांच्या निलंबनांला स्थगिती नाहीच

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेत 12 आमदारांनी घातलेल्या गोंधळामुळे विधान सभा अध्यक्षांनी त्यांना निलंबित करण्यात आले होते. या विरोधात या आमदारांनी स

तू फक्त नगरला ये, तुझा दरबार उधळून लावू
शिक्षक, पदवीधरची निवडणूक जाहीर
अवैध धंदे चालकांना लातूर पोलिसांचा बसला जोरदार दणका

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेत 12 आमदारांनी घातलेल्या गोंधळामुळे विधान सभा अध्यक्षांनी त्यांना निलंबित करण्यात आले होते. या विरोधात या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांच्या निलंबनांला स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 11 जानेवारी रोजी होणार आहे.
विधानसभा सभागृहात गोंधळ घातल्या प्रकरणी तसेच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले होते. त्यात आशिष शेलार, संजय कुटे, गिरीश महाजन, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचा समावेश होता. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण संबंधित केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्याबाबत विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ठराव मांडला होता. या ठरावास भाजपकडून जोरदार विरोध झाला. सभागृहात काही आमदारांनी यावरुन गोंधळ घातला. यामुळे गदारोळ झाला होता. तसेच तालिका अध्यक्षासमोरील माइक आणि राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकारामुळे भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले होते. या कारवाईनंतर 12 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांना अजून कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

COMMENTS