Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महसुल सप्ताहानिमित्त अंबाजोगाई तहसील कार्यालयात माजी सैनिकांशी संवाद

अंबाजोगाई प्रतिनिधी - तालुक्यातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या पत्नी यांच्याशी अंबाजोगाई तहसील कार्यालया मार्फत तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाल

कायद्याची भीती मनातून काढून टाका : जिल्हा न्यायाधीश अनिरुध्द गांधी
फलटण नगरपरिषदेच्या खुल्या भूखंडावर अतिक्रमण; स्थानिक नागरिकांचा उपोषणाचा इशारा
भाविकाचा अपघातात मृत्यू; पाच जण जखमी

अंबाजोगाई प्रतिनिधी – तालुक्यातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या पत्नी यांच्याशी अंबाजोगाई तहसील कार्यालया मार्फत तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तसहीलदार सचिन देशपांडे व नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड, पेशकार शशिकांत गायकवाड यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी सैनिकांच्या महसुल संबंधी तक्रारी व वैयक्तीक अडचणी, प्रश्न समजावून घेतले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित महसुल सप्ताहानिमित्त माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबीयांशी संवाद साधण्यात आला यावेळी माजी सैनिकांच्या काही समस्या अडचणी, असतील तसेच त्यांना मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत सकारात्मकता दर्शवित महसुल विभागाने पुढाकार घेतला व संवाद बैठकीचे आयोजन शनिवार, दि.5 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय येथे केले होते. माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी आणि त्यांचे कुटूंबिय यांचे तहसील कार्यालयासंबंधीत जे काही प्रलंबित कामे असतील ते सर्व विना विलंब सोडविण्यात येतील असे आश्वासन यावेळी संबंधितांना देण्यात आले. शासनाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे माजी सैनिकांच्या संबंधित समस्या, अडचणी यांचे निराकारण करण्यासाठी पाठविण्यात येतील. सहानुभूतीपुर्वक सैनिक परिवाराच्या अडचणी सोडविण्याचा प्राधान्याने प्रयत्न केला जाईल असे महसुल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. सैनिकांतर्फे आपले मनोगत व्यक्त करताना जय जवान आजी – माजी सैनिक संस्थेचे सचिव कॅप्टन अभिमन्यु शिंदे यांनी सर्वप्रथम या उपक्रमाबद्दल  महाराष्ट्र शासन व तहसील कार्यालयाचे अभिनंदन केले. सैनिकांचे पुर्ण आयुष्य हे देशाच्या संरक्षणासाठी खडतर अशा वातावरणात सिमेवर जिवाची पर्वा न करता गेलेले असते मुळातच सैनिकांचे जिवन हे शिस्तप्रिय असते. कारण, सैनिकांना तसे शिक्षण देवून घडविलेले असते असे सांगुन शिंदे म्हणाले की, सेवानिवृत्तीनंतर वृद्ध झालेला सैनिका हा सिव्हील वातावरणासाठी अनभिज्ञ असतो म्हणून शासनाने या सैनिकांकडे लक्ष देण्याची गरज असते. माजी सैनिकांच्या व्यथा व अडचणी जाणून घेवून सैनिकांशी संवाद साधून व सैनिकांविषयी सहकार्याची भावना ठेवून आज आयोजित केलेला कार्यक्रम कौतुकास्पद आहे. यातून शासनाने सैनिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी एक समिती गठीत करावी. व या समितीमध्ये सैनिकांना ही स्थान देण्यात यावी अशी अपेक्षा सचिव शिंदे यांनी व्यक्त केली. सैनिक संस्थेचे संचालक माजी सैनिक कुंडलिकराव गव्हाणे यांनी माजी सैनिकांना शासनाच्या घरकुल, अन्नसुरक्षा तसेच आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा. माजी सैनिकांना उद्योजक बनण्यासाठी शासनाची पडीक जमिन भाडेतत्वावर द्यावी., वंदनिय बासाळासाहेब ठाकरे सन्मान योजनेतंर्गत नगरपालिका व ग्रामपंचायत मधील घर भाडे माफ करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी जय जवान आजी – माजी सैनिक संस्थेचे 65 हून अधिक स्त्री-पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंबाजोगाई तहसिल कार्यालयाकडून बैठकीची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे महसुल विभाग, तहसीलदार व तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी आणि उपस्थितांचे आभार माजी सैनिक कॅप्टन शेख उस्मान साहेब यांनी मानले.

COMMENTS