Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूल वाडीवऱ्हे विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

100% यशस्वी निकालाची सातत्यपूर्ण परंपरा

नाशिक - मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक, संचलित ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूल वाडीवऱ्हे  इयत्ता दहावी वर्गाचा *२०२३-२४* या शैक्षणिक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ते आश्‍वासन पूर्ण करतील : अण्णा हजारे यांनी व्यक्त केला विश्‍वास
ओबीसींचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणार ः मुख्यमंत्री शिंदे
उत्तराखंडच्या चार धाम यात्रेला सुरूवात

नाशिक – मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक, संचलित ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूल वाडीवऱ्हे  इयत्ता दहावी वर्गाचा *२०२३-२४* या शैक्षणिक वर्षाचा निकाल जाहीर झाला. यशाची परंपरा अबाधित ठेवत ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत  यश मिळवत, आपल्या अंगीभूत असलेल्या विकासात्मक व प्रगतीशील वाटचालीचा अध्याय पुढे सुरू ठेवला आहे. *आम्ही घडविणार … आदर्श माणूस ! आदर्श भारत !!’* या उद्देशाने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सर्वंकष गुणात्मक शिक्षण देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. त्याचीच परिणीती म्हणजे आजचे विद्यार्थ्यांचे हे यश आहे.

       इयत्ता दहावीचा १००% निकाल लागला असून प्रथम क्रमांक *स्मृतिरंजन बादल राऊत* ०८१.८९,% द्वितीय क्रमांक *विनोद एकनाथ गोहिरे* ०७९.६०%. तृतीय क्रमांक *ओमकार दत्तू मते* ७८.००%  यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. 

         विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक प्रगतीला संस्थेचे संस्थापक *प्रकाश कोल्हे* तसेच संस्था सचिव *ज्योती कोल्हे* यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना *मुख्याध्यापिका सुरेखा आवारे* व शिक्षकवृंद यांनी आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS